Id SKU Name Cover Mp3
Samanya Nagarikansathi Diwani Kayda


60 116
Download Bookhungama App

सामान्य नागरिकांसाठी दिवाणी कायदा - अॅड. किशोर य. माने

Description:

वाचक याचा उपयोग करूनविद्यार्थी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवितील, वकीलबंधू चांगले वकील बनून नामांकित वकील होतील व सामान्य नागरिक कायद्याबाबत माहितीमुळे गैरसमजास बळी पडणार नाहीत.’दिवाणी कायद्यांची संहिता १९०८ या मूळ कायद्याचा अभ्यास, माहिती भाग १ ते भाग ११ आवश्यक त्या सर्व तरतुदींसह केला आहे.

भाग पहिला - यामध्ये एकंदर१५१ सेक्शन्सचापूर्ण नियमांच्या माहिती, तरतुदींसह केला आहे. सत्यता ७ सेक्शन्स रद्द केले आहेत. म्हणजे मूळ १५८ सेक्शन्स होते. हे जे सेक्शन्स आहेत ते दिवाणी कायद्याचे मूळ शरीर आहे. हे बदलत नाहीत. त्यास विधिमंडळाच्या (लेजीस्लेचर) लोकसभा, राज्यसभा या माध्यमाच्या मान्यतेनेच बदल केला जातो. (संसद) यास पहिला भाग (फर्स्ट पार्ट) म्हणून संबोधले जाते. हे दिवाणी कायद्याचेशरीरमूळ कायदा आहे.

भाग दुसरा - जो की ५१ ऑर्डर्सने बनला आहे. ‘यास परिशिष्ट, पुरवणी १असे संबोधले जाते. या प्रत्येक ऑर्डर खाली नियम (रूल्स) बनले आहेत पण त्याबाबत स्पष्टपणे दिवाणी कायद्यांच्या संहितेत म्हटले आहे. हे नियम व तरतुदी कायद्याच्या वापराची कार्यपद्धती आहे की दिवाणी कायद्याचे मूळ (शरीर) प्रमाणे अधिकार क्षेत्र ठरवून दिले आहे, त्यासी काहीही विसंगती न करता नियम व त्यांचे तरतुदीचा वापर करणे बंधनकारक आहे. विविध उच्च न्यायालयांना सदर नियम बदलण्याचा अधिकार आहे पण असे बदल दिवाणी कायद्यांची संहिताभाग पहिलाशी विसंगत असता कामा नाही. (अशा प्रकारे दिवाणी कायद्यांची संहिता बनली आहे.)

मूळ दिवाणी कायदा

दिवाणी कायद्यांची संहिता, १९०८

या कायद्यामध्ये सुधारणा केली की ज्या कारणे या कायद्याचे संरक्षण घेण्याऱ्या व्यक्तीचे त्रास कमी करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळणेबाबत संसदेने विचार केला आहे.

त्यानुसार सुधारित कायदे

दिवाणी कायद्यांची प्रक्रिया संहिता (सुधारित) १९९९ (कायदा नं. ४६/१९९९.)

यामध्ये परत सुधारणा केल्या -

दिवाणी कायद्यांची प्रक्रिया संहिता (सुधारित) २००२ (कायदा नं. २२/२००२)

सदरील कायदा १..२००२ पासून प्रचलित करण्यात आला.

आता वरील दिवाणी कायद्यांची प्रक्रिया संहिता प्रचलित करण्यात आली. त्यानुसार त्याबाबतच्या तरतुदीनुसार कायदा पूर्ण केला आहे.

आता मी स्वतः एक विधिमहाविद्यालयाचा प्राध्यापक, नंतर वकील म्हणून दिवाणी कायदा विद्यार्थ्यांना शिकविला आहे. हेच दिवाणी दावे चालविण्याचे काम २० - २५ वर्षे करीत आहे. या सर्वांमुळे मी अनुभवलेल्या अडचणी व अनुभवाची शिदोरी मी प्रथम दिवाणी कायद्याचे पुस्तक लिहिले ते इंग्रजीमध्ये. माझा हेतू की हा इतका विस्तृत कायदा दृष्टिक्षेपात विद्यार्थी, वकीलबंधू सामान्य नागरिकांना जाणता यावा. पण अनेकांनी लक्षात आणून दिले की हा कायदा पुस्तकरूपानी मराठीत असावा. माझ्या आवडी व अनुभवामुळे मी विद्यार्थी, वकीलबंधू, सामान्य नागरिकांसाठी हा दिवाणी कायदा मराठीमध्ये अनुवादित केला आहे. त्यातील उणिवा येथे पूर्ण केल्या आहेत व दिवाणी कायद्यांची प्रक्रिया संहिता पूर्ण रूपाने मराठीत सादर केली आहे.

विशेष गोष्टी

)   भाग १ ते ११, () यामध्ये प्रथम लक्षात आणू इच्छितो की दिवाणी कायदा १९०८ हा १५१ सेक्शन व ५१ ऑर्डर्स बनला आहे. पण या भागांमध्ये मी सेक्शन्स व त्यास संबधित ऑर्डर अशी मांडणी केली आहे. याकारणेया ऑर्डरला कोणता सेक्शन वापरावयाचा किंवा हा सेक्शन कोणत्या ऑर्डरशी संलग्न आहेयाबद्दल धावपळ न करता तो एका जागी देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्येक ऑर्डर किंवा सेक्शनमध्ये दिवाणी कायद्यांची प्रक्रिया संहिता (सुधारित) १९९९ व २००२ मध्ये कोणते बदल झाले व कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या. तसेच इतर दिवाणी कायद्याप्रमाणे झालेले बदल, समाविष्ट गोष्टींचा संदर्भ जागोजागी दिला आहे. त्याबाबत पण अडचण येणार नाही.

)   सर्व सेक्शनमधील प्रत्येक उप - कलम पूर्णपणे समजविला आहे. प्रत्येक ऑर्डरमधील नियम पूर्ण वर्णन केले आहेत.

महत्त्वाचे भाग १ ते ११ मध्ये सेक्शन व त्या संबंधित ऑर्डर (त्याचे सेक्शनची उप - कलम व ऑर्डर मधील नियम) सुधारणे सह पूर्णपणे मांडले आहेत. त्याशिवाय जे सेक्शन ऑर्डरशी संबंधित नाहीत ते वेगळे समजावले आहेत.

जी ऑर्डर सेक्शनशी संबंधित नाही, त्या प्रत्येक ऑर्डर, त्यांचे नियमांची पूर्ण माहिती दिली आहे.

अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तयारीसाठी, वकीलबंधूंना दावे चालविण्यासाठी व सामान्य नागरिकांना दिवाणी कायद्याची जाण येऊन त्याचा उपयोग करण्यासाठी हा अॅडव्होकेट लेखकाचा मनापासून प्रयत्न आहे आणि त्यासाठीविद्यार्थी, वकीलबंधू, सामान्य नागरिकांसाठी एकपूर्ण मराठी पुस्तक सादर केले आहे. माझी खात्री आहे, वरील वाचक याचा उपयोग करूनविद्यार्थी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवितील, वकीलबंधू चांगले वकील बनून नामांकित वकील होतील व सामान्य नागरिक कायद्याबाबत माहितीमुळे गैरसमजास बळी पडणार नाहीत.’

किशोर य. माने

 

लेखक, (अॅडव्होकेट व प्राध्यापक)


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि