60 116
Download Bookhungama App

सख्याहरी - मयुरेश वाटवे

Description:

दोन महाविद्यालयीन मित्र आणि त्यातील एकाची मैत्रीण यांच्यामधील पत्रसंवाद म्हणजे ‘सख्याहरी’. गोव्यातील पत्रकार मयुरेश वाटावे यांचा हा पत्रसंवाद दैनिक गोमन्तकच्या महाविद्यालय या पुरवणीत १९९९ साली वर्षभर प्रसिद्ध झाला. ‘Sakhyahari’ is collection of letters written by two college friends and girlfriend of one of them. “Sakhyahari “ written by Goan journalist Mayuresh Watve were also published in ‘Daily Gomantak’ as Column during 1999.प्रस्तावना मराठी साहित्यामध्ये अभिरुचीसंपन्न विनोदाची एक उज्ज्वल परंपरा आहे. राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा दिग्गजांनी घालून दिलेल्या मळवाटेवरून मार्गक्रमण करणारी बरीच नवी मंडळीदेखील आहेत. पत्ररूपाने केलेल्या मार्मिक मल्लिनाथीचे एक छोटेसे पण सकस दालन या विनोदी साहित्यामध्ये दिसते. वरवर पाहता असे पत्ररूप लेखन प्रासंगिक व वरवरचे वाटत असले, तरी त्यामधूनही मार्मिक टिप्पणी करता येते चिमटे काढता येतात. गोवेकरांना अशा वृत्तपत्रीय लेखनाचा अनुभव नक्की असेल. मम्मट, अमूक तमूकच्या आठवणी अजून पुसल्या गेल्या नसतील. अशाच त-हेची पत्ररूप जुगलबंदी युवा पत्रकार मयुरेश वाटवे यांच्या या पुस्तकात दिसेल. फक्त ही पत्रे लिहिणारे सख्याहरी आणि ममामिया यांची मानसिकता ही महाविद्यालयीन युवकाची आहे. त्यामुळे आजच्या महाविद्यालीन युवकाच्या मानसिकतेतून केले गेलेले हे धमाल लेखन आहे. अशा प्रकारच्या विनोदाची मजा तो निर्विष असेल तर अधिक चांगल्या प्रकारे लुटता येते. वैयक्तिक उणीदुणी काढण्याचे द्वेष मत्सरादी भावनांचे दर्शन घडवण्याचे हे स्थळ नव्हे. हे भान ठेवून हे लेखन श्री. वाटवे यांनी केलेले आहे, त्यामुळे त्याची खुमारी काही और आहे. काही पत्रे सख्याहरीची मैत्रीण मंजूचीही आहेत ! मार्मिकपणा, व्यासंग आणि चांगल्या दर्जाच्या विनोदाची जाण उपजतच असल्याने वाटवे यांचे हे लेखन बहारदार झाले आहे .कॉलेजच्या कट्ट्यावर बसून लिहावे तसे हे लेखन केले गेले आहे. त्यामुळे त्यामध्ये महाविद्यालीन जीवनाचा अपरिहार्य भाग असलेली प्रेमप्रकरणे, नवे चित्रपट, मित्र-मैत्रिणी, महाविद्यालयीन निवडणुका सण-उत्सव असे साधेसाधे नित्यानुभवाचे विषयच दिसतील. परंतु शैली, मिश्कीलपणा आणि चिमटे या दृष्टीने ही सारी पत्रे फार वाचनीय झाली आहेत . - परेश प्रभू (संपादक दै. नवप्रभा)


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि