Id SKU Name Cover Mp3
Saha Te Satha


30.00 58.00
Download Bookhungama App

सहा ते साठ -

Description:

स्त्रीच्या विकासाला फार मोठा अर्थ आहे तो केवळ तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भातच नव्हे; तर स्त्री म्हणून समाजात, देशात ती वावरते त्या दृष्टीनंही तिचा विकास ही राष्ट्राची गरज आहे. सुजाण स्त्रीच्या कुटुंबात, तिचा पती आणि तिची मुलं खऱ्या अर्थानं सुखाचा शोध घेऊ शकतात. सुजाण स्त्रीच्या हातात जसं घर समर्थपणे चालतं तसं सुजाण स्त्रियांच्या देशात, राज्यही समर्थपणे उभं राहातं.सहा ते साठ
स्त्रीजीवनाचे विविध टप्पे

भूमिका

ऑगस्ट १९६७ मध्येस्त्रीमासिकाचा वर्षारंभ अंक प्रसिद्ध झाला. ‘सहा ते साठविशेषांक-अशी या अंकाची मांडणी होती. आमच्या वाचकभगिनींनी, या अंकाचं अतिशय उत्साहपूर्ण स्वागत केलं. त्या वेळी, त्याचं रसग्रहण करणारी, कौतुक करणारी अनेक पत्रं आमच्याकडे आली. आज त्या अंकातील सर्व लेख सुधारून, संपादित करून, पुस्तकरूपाने आमच्या वाचकांच्या हाती सोपविताना अत्यंत आनंद वाटत आहे. हे नवं प्रकाशन अधिक परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने, मूळ लेखसंग्रहात, दोन लेखांचा आम्ही नव्याने समावेश केला आहे. मानसशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या दोन शास्त्रांच्या दृष्टिकोणांतून स्त्रीजीवनविषयक विचार या लेखांत मांडले आहेत. स्त्रीजीवनाचा साकल्याने विचार करताना-भावना, विचार, वास्तव परिस्थिती यांच्याबरोबरच दोन शास्त्रांच्या आधाराने दिलेली विशिष्ट बैठक औचित्यपूर्ण ठरेल असा विश्वास वाटतो.

सुरुवातीला या अंकाची मूळ कल्पना निश्चित करताना, आमच्या मनात काही विशिष्ट हेतू होता. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती आयुष्य संपेपर्यंत जगतच असते. स्त्रीही याला अर्थातच अपवाद नाही. पण जिवंत आहे म्हणून जगणं आणि जीवनाचा अर्थ समजून ते जगणं यात फार मोठा महत्त्वाचा फरक आहे. हा फरक, ही अर्थपूर्ण जाणीव स्त्रियांना द्यावी, हाच या लेखमालेमागील उद्देश होता. गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांत स्त्रीला शिक्षणाचा लाभ होऊ लागला आहे. कायद्याच्या संमतीनं तिच्या मुलभूत गरजांना संरक्षण मिळालं आहे. तिच्या प्रगतीच्या मार्गात येणारे आजवरचे अडसर दूर झाले आहेत. तिच्या विकासाचा मार्ग आता खुला झाला आहे. पण हे सारं घडूनही, आजच्या स्त्रीनं जर या सुविधांचा विवेकानं, डोळसपणानं उपयोग करून घेतला नाही, तर हे सारं मिळवण्यासाठी धडपडलेल्या थोरामोठ्यांचे कष्ट व्यर्थ ठरतील. हे न व्हावं, तसंच तिच्या मनाच्या तळातील विचार, जाणीव जागी व्हावी आणि तिनं सुबुद्धपणे आपलं आयुष्य जगावं ही खरी इच्छा आहे.

स्त्रीच्या विकासाला फार मोठा अर्थ आहे तो केवळ तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भातच नव्हे; तर स्त्री म्हणून समाजात, देशात ती वावरते त्या दृष्टीनंही तिचा विकास ही राष्ट्राची गरज आहे. सुजाण स्त्रीच्या कुटुंबात, तिचा पती आणि तिची मुलं खऱ्या अर्थानं सुखाचा शोध घेऊ शकतात. सुजाण स्त्रीच्या हातात जसं घर समर्थपणे चालतं तसं सुजाण स्त्रियांच्या देशात, राज्यही समर्थपणे उभं राहातं.

 

-प्रकाशक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि