75 100
Download Bookhungama App

रोहन कन्हाय - वि. ग. कानिटकर

Description:

कन्हायच्या कौशल्यपूर्ण क्रिकेटचे मर्म उलगडून दाखविणारे हे इ-बुक. रोहन कन्हाय

म्हणजे शंभर धावांची निश्चिंती असे जवळ जवळ ठरून गेले आहे. कन्हायचे चाहते तर त्याला प्रतिभावान क्रिकेटिअर असेच म्हणतात. कारण धावांच्या संख्येबरोबरच धावांसाठी करावयाच्या फटकेबाजीतील त्याचे कौशल्य डोळ्यांचे पांरणे फेडणारे असते.’ ‘क्रिकेट कसे खेळावे?’ अशा प्रकारच्या पुस्तकी सल्ल्याकडे पाठ फिरवून त्याने स्वतःच्या हिकमतीवर आक्रमक वाटचाल केली आणि जगातील श्रेष्ठ फलंदाजात आपले आसन भरभक्कम केले. ब्रिटिश गियानात जन्मलेला हा खेळाडू अतिशय धडाडीने पुढे आला. इतर वेस्ट इंडीज खेळांडूंप्रमाणेच कन्हाय हाही स्पष्टवक्ता आहे. शिवाय त्याची विनोदबुद्धी अतिशय धारदार आहे. क्रिकेटक्षेत्रातील विविध प्रश्नांवर तो आपली मते अतिशय मोकळेपणाने सांगतो. चार्ली ग्रिफीथची गोलंदाजी ही आज एक विवाद्य गोष्ट झाली आहे. ग्रिफीथ हा गोलंदाजी करतो की चेंडू फेकतो? ग्रिफीथ हा गोलंदाजीच करतो ह्या मताचाच पाठपुरावा कन्हायने केला आहे आणि ह्या पाठपुराव्याची त्याची कारणे भक्कम आणि आश्चर्यकारक आहेत. त्याच्या जीवनातील ही विविधता श्री. वि. . कानिटकर ह्यांनी आकर्षक आणि प्रसन्न भाषेत सांगितली आहे. कन्हायच्या कौशल्यपूर्ण क्रिकेटचे मर्म उलगडून दाखविण्याचे कार्य त्यांनी फार चांगल्या रीतीने पार पाडले आहे. कन्हायची ही सर्वांगीण कहाणी क्रिकेटप्रेमी लोकांना फार फार आवडेल.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि