60 116
Download Bookhungama App

रेशमी पडदा - कल्पी श्याम जोशी

Description:

स्त्री जाणीवेच्या विविध अनुभवांना त्यांची कविता स्पर्श करू लागली. कवितेविषयीची प्रीती आणि उत्कटता, तन्मयता आणि व्याकुळता त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून जाणवू लागली. स्त्री मनाची आर्तता, अज्ञावग्रासेन बालमनाची होणारी परवड, त्या पार्श्वभूमीवर कणखरपणे उभे राहण्याची जिद्द, तरूणवयातील हळव्या नाजूक जाणीवा, आयुष्याच्या चांगुलपणाविषयीचा आशावाद आणि प्रेमाची असोशी त्यांच्या कवितेतून भावानुकुल शब्दकवेनं अभिव्यक्त होवू लागली.मनोगत लहानपणापासून असलेली वाचनाची आवड... वेळेचे भान नसायचे. दिवसाला तीन चार पुस्तकांचा फडशा पाडायचे. आई ओरडायची अभ्यास कधी करणार. श्यामची आईने माझ्या मनाला कोरले. वि. स. खांडेकरांची “उल्का” माझ्या हृदयात अजुनही प्रदिप्त आहे. ही आणि अशी कितीतरी पुस्तके माझ्याशी संवाद करू लागली... लहानपणीची हलाखीची परिस्थिती, त्यातही देवी शारदेची उपासना सुरूच होती. मला शारदा माता प्रसन्न होईल ही आशा होतीच. माझ्या हातात लेखणी कधी आली हे नक्की सांगता येत नाही. अखंड वाचन, आणि लिखाण सुरूच होते. रोज काहीतरी नवीन लिहिल्याशिवाय माझ्या डोळ्यात झोपच येत नाही... अशीच या पुस्तकाची पहिली कविता लिहिली. आणि दुसरी लिहिली... मनात काहीही साचा ठरविला नव्हता की आपण असला काही प्रयोग करायचा. आता मी या पुस्तकातील मुख्य पात्राशी समरस होऊ लागले. रोज एक भाग लिहिला जात होता. माझ्या मनाला आता एक वेगळेच समाधान मिळू लागले. काहीतरी निर्मिती होते आहे. ही कल्पना मनाला प्रफुल्लीत करीत होतीच, पण माझे मित्र मैत्रीणी आणि घरातले माझे लोक, त्यात माझी लेक श्रृती... पती श्याम, मुलगा सुदीप या सर्वांचे सहकार्य आणि प्रेरणा मला पुन्हा लिहायला उद्युक्त करीत होती. मित्र आणि मैत्रीणीमध्ये मी प्रिया गवई, संतोष बडगुजर आणि प्रशांत मडपुवार यांची नावे आवर्जुन घेते... रोज एक भाग लिहिला की मिळणारी प्रेरणा आणि शाबासकी यातुनच... “आशा” हे पात्र रंगवू लागले... या पुस्तकाला “रेशमी पडदा” हे नाव देण्याचे कारणही हेच आहे... मनातले कल्पनेचे पंख रेशमी पडद्याप्रमाणे झुलत होते, आणि शब्दाचे नर्तन कागदावर सुरू होते. मला सतत वाचायला लिहायला वेळ देणारे माझे पती श्याम यांचा मी आदर करते ते याचसाठी... अष्टपैलू व्यक्तीमत्व जे सर्वांचे लाडके आहेत असे श्री. श्रीपाद प्रभाकर जोशी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. सोबतच श्री. मदनराव धनकर यांचे विद्वत्ताप्रचुर आशीर्वाद देखील मला मिळाले आहेत. मी खरोखरच या सर्वांची ऋणी आहे... अजुनही ज्यांचे अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य लाभले त्या सर्वांची मी ऋणी आहे. “रेशमी पडदा” हे पहिलेच पुस्तक वाचकासमोर ठेवतांना मला अतिशय आनंद होतो आहे... आशा आहे तुम्हा रसिकांना ते नक्की आवडेल...! धन्यवाद! कल्पी श्याम जोशी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि