Id SKU Name Cover Mp3
Ratankil


60 100
Download Bookhungama App

रत्नकीळ - आनंद अंतरकर

Description:

रत्नकीळ’ हा शब्द संतसाहित्यवाचनातून आला आहे. कीळम्हणजे दिव्य उजेड१९७७ साली - म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वी कै. पु. भा. भावे साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले, त्या निमित्तानं मी त्यांच्यावरढगया शीर्षकाचा व्यक्तिचित्रात्मक लेख लिहिला होता. तो वाचून भावे यांनी मला व्यक्तिचित्रं हा साहित्यप्रकार लिहिण्यासाठी उद्युक्त केलं होतं. त्यांचं म्हणणं: “एखाद्या कसलेल्या लेखकासारखी तुमच्या लेखणीला लेखनसिद्धी लाभलेली आहे. हा प्रकार तुम्ही उत्तम प्रकारे लिहू शकाल. शिवाय एखाद्या संपादकानं आपल्या आवडत्या लेखकांवर लिहिणं हे वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. अशी पुस्तकं मराठीत दुर्मीळ आहेत.”

भाव्यांच्या विश्वासाला मी बऱ्यापैकी पात्र ठरलो असं आता म्हटलं पाहिजे. कारण मी लिहीत गेलो तसातसा वाचकांचा उदंड नि उत्स्फूर्त प्रतिसाद मला लाभत गेला. यांत अनेक नामवंत साहित्यिकांपासून रसिक वाचकांपर्यंत अनेकजणांचा सहभाग आहे. निमित्तानिमित्तानं मी लिहीत राहिलो.

आणखी एक महत्त्वाचा उल्लेख कृतज्ञतापूर्वक करायला हवा. मराठीतले ज्येष्ठ नि गुरुतुल्य संपादक श्री. श्री. पु. भागवत यांनी एक दिवशी दूरध्वनीवरून झालेल्या संवादात माझ्या या लेखनाचं मोकळ्या नि सहृदय शब्दांत कौतुक केलं. काही आवडलेल्या लेखांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. एवढंच नव्हे, तर त्यांच्यामौज प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रसिद्ध करण्याची इच्छाही प्रदर्शित केली. (माझ्या काही वैयक्तिक कारणांसाठी मी हे पुस्तकविश्वमोहिनीतर्फे प्रकाशित करीत आहे.) श्रीपुंचं हे ऋण मी आयुष्यभर मस्तकावर अभिमानानं मिरवीत राहीन.

रत्नकीळहा शब्द संतसाहित्यवाचनाच्या छंदातून खुडला आहे.

भानुदासांच्या रचनेत तो आढळला. ‘कीळम्हणजे दिव्य उजेड. मला तो एकदम भावला.

या ग्रंथातल्या सर्वच व्यक्तींवर लिहीत असताना त्या त्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधत असल्यासारखी, प्रत्यक्ष भेट घडत असल्यासारखी उत्कटता नि आनंद मी अनुभवला. आता हीच प्रचीती वाचकांना आली, तर लेखनाचं सार्थक मानायचं.

अखेर वाचक संतुष्ट होत नसेल, तर लेखनाचं प्रयोजन तरी काय?

 

- आनंद अंतरकर 


Format: Adaptive

Publisher: Vishwa Mohini Prakashan