Id SKU Name Cover Mp3
रानोमाळ


30 76
Download Bookhungama App

रानोमाळ - संजन मोरे

Description:

संजन मोरे...ह्यांच्या कथा व्यंकटेश माडगुळकर ह्यांच्या साहित्याशी नात जोडतात यात मला शंका नाही. साधी सरळ..आणि तरीही रसरशीत भाषा...हे त्यांचे वैशिष्ट्य...निअर्गाचे बारकाईने वर्णन –हा त्यांच्या लेखनाच स्वभावविशेष म्हणायला हवा.रानोमाळ चा नायक आहे...बाळा..... कोण आहे हा बाळा? गल्लीतली पोरं त्याला मिसळून घेत नव्हती. त्याला वडिल नव्हते. त्याच्या आईविषयी चांगलं बोललं जात नव्हतं. भावकीतली पोरं “ये कडू च्या … “ अशी त्याला हाक मारायचे. मग भावकीच्या पोरात त्याला मिसळावेसे  वाटायचे नाही. पोरं सुट्टीत धमाल करायची.राना शिवारात मनसोक्त भटकायची. रानमेवा गोळा करत हिंडायची, झाडावर चढायची. पेरू, जांभळं, आवळे, सिताफळं, बोरं, गाजरं. शिवारात गेल्यावर मेव्याला तोटा नव्हता. त्याला पण खूप भटकावंसं  वाटायचं. पोहावंसं  वाटायचं, सूरपारंब्या खेळाव्यात असं  वाटायचं. त्याला जास्त काही कळत नव्हतं. एकदा त्याने सोबत्याला विचारले सुद्धा…….   “तूमच्या घरी बाहेरच्या जातीचा माणूस येतो म्हणून तू कडूचा आहेस “ असं काहीतरी न कळण्यासारखं सांगीतलं होतं त्याने त्यावेळी. मग त्याने न राहून आईला विचारले सुध्दा. “ बाळा आपली शेती आहे, ती भावकीला घशात घालायची आहे. हे काका तूझ्या वडिलांचे मित्र आहेत.  यांच्या माघारी त्यांचाच आधार, शेतीचं ते बघतात. भावकीला ते बघवत नाही. तू त्यांच्यात मिसळू नकोस.   “.... घाबरलेला बाळा आतल्या आत बंदिस्त राहू लागला...मित्रांपासून तुटत गेला...आपल्याच कोषात जगू लागला. आणि अशातच त्याला एक नवा मित्र मिळाला....”उमाकांत”...आणि बाळाचे जग बदलले. बाळा आपले जगणे निसर्गात शोधू लागला...त्याला एक मोकळा श्वास लाभला... झाड.. .झुडप... नद्या.. ओहोळ... डोंगर.. टेकड्या... पक्षी..प्राणी...सगळेच त्याला आता त्याचे सवंगडी वाटू लागले..आणि त्यांच्यात त्याला त्याचे अस्तित्व सापडू लागले... संजन मोरे...ह्यांच्या कथा व्यंकटेश माडगुळकर ह्यांच्या साहित्याशी नात जोडतात यात मला शंका नाही. साधी सरळ..आणि तरीही रसरशीत भाषा...हे त्यांचे वैशिष्ट्य...निअर्गाचे बारकाईने वर्णन –हा त्यांच्या लेखनाच स्वभावविशेष म्हणायला हवा. आमच्या नुक्कड ब्लॉग आणि संजन मोरे ह्यांच्या फेसबुक पेज वर सुद्धा ह्या गजा प्रचंड गाजल्या आहेत. जरूर संग्रही ठेवावे असे पुस्तक...रानोमाळ.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि