60 150
Download Bookhungama App

रमाबाई रानडे यांचे चरित्र - श्री. रविप्रकाश कुलकर्णी

Description:

चरित्रलेखन हे बऱ्याचदा पूर्वसुरींच्या लेखकाचा मागोवा घेतं करायचं असतं त्याला हे चरित्र अपवाद नाही. मात्र हे करताना काही नवी निरीक्षणं आढळली त्याची नोंद प्रस्तुत चरित्रात आढळेल. त्यामुळं चोखंदळ वाचकांना आणखी काही सुचू शकेल.प्रस्तावना माझे थोडेसे - ‘उंच माझा झोका’ मालिकेमुळे रमाबाई रानडे यांच्या संदर्भात जे कुतूहल निर्माण झाले आणि त्यातील संदर्भाबाबत चौकशा-शंका सुरू झाल्या त्यातून रमाबाई रानडे यांचे चरित्र लिहिण्याची कल्पना निघाली. चरित्रलेखन हे बऱ्याचदा पूर्वसुरींच्या लेखकाचा मागोवा घेतं करायचं असतं त्याला हे चरित्र अपवाद नाही. मात्र हे करताना काही नवी निरीक्षणं आढळली त्याची नोंद प्रस्तुत चरित्रात आढळेल. त्यामुळं चोखंदळ वाचकांना आणखी काही सुचू शकेल.... ह्या चरित्रलेखनासाठी मित्रांनी आणि सुहृदांनी पाठपुरावा केला म्हणूनच हे लेखन होऊ शकले. त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना जयवंत चुनेकरांचा स्वतंत्र उल्लेख एवढ्याचसाठी करायचा की अन्यथा हे लेखन होतंच ना! ह्या इथे भरत कान्हू फुलावरे यांचा उल्लेख करणेही अगत्याचे आहे. ती सगळी चित्तरकथाच संक्षेपाने सांगायला हवी.- एके दिवशी संपूर्ण चरित्राचे हस्तलिखित लोकल प्रवासात हरवले! कसे झाले? काळजी घेतली नाही....? झालं एवढं खरं! शोधाशोध... करायचे ते सगळे प्रयत्न करून झाले. पण व्यर्थ! अशा हरवलेल्या गोष्टी मिळत नसतात... मग काय? प्रकाशक ह. अ. भावे यांनी उमेद दिली. नव्याने लिहायला सांगितलं. ‘पुनश्च हरी ॐ’ लोकमान्यांच्या अग्रलेखाची आठवण झाली... नव्याने साठ टक्के लेखन जड हाताने लिहिलं. लिहीत होतो. पण बरोबर पंधरा दिवसांनी फोन आला, ‘रमाबाई रानडे चरित्र फाईल सापडली आहे!’ हा फोन होता भरत कान्हू फुलावरे यांचा. त्यांना ही फाईल सापडली खोपोलीला रात्री १२ वाजता. संध्याकाळी साडेपाचवाजता डोंबिवली लोकलमधे गेलेली फाईल खोपोलीला रात्री १२ वाजता मिळते हे सगळं आश्चर्यकारकच! पण त्यांनी पंधरा दिवसांनी का कळवले? दुसऱ्या शिफ्टमधून परतताना फुलावरे यांना फाईल सापडली. ‘रमाबाई रानडे’ हे वाचून त्यांनी घरी फाईल नेली. पण नंतर ते विसरूनच गेले! चारपाच दिवसांनी ते फाईल वाचू लागले. ते पाहून त्यांच्या पत्नीदेखील म्हणाल्या तुमचं झालं की मला पण रमाबाईंबद्दल वाचायचं आहे... भरतच्या पत्नीला हस्तलिखितावरचा माझा पत्ता दिसला. त्यांनी आपल्या यजमानांना मला फोन करायला सांगितला. संध्याकाळी त्यांनी फोन केला तेव्हा मी राजन खान यांच्या ऑफिसात होतो. क्षणभर काय बोलावं सुचेना. मी काहीतरी विचारत पण होतो. हे सगळं सांगायचं कारण साक्षीला राजन खान, तेजुताई होत्या. अर्थात दुसऱ्या दिवशी सकाळी मी कर्जतला गेलो. फाईल पाहिल्यावरचा आनंद- तो अनुभव वेगळा. क्वचितच कुणाच्या वाट्याला येणारा.... तेव्हा ह्या चरित्रलेखनात चांगले जे काही असेल त्याचे धनी ही सर्व मंडळी आहेत. बाकी गोष्टीची जबाबदारी माझी... शेवटी तुकाराम महाराजांच्या शब्दांत म्हणायचं तर- फोडिले भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाही ॥ - रविप्रकाश कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि