30 50
Download Bookhungama App

राखीव सामर्थ्य हवेच - ह. अ. भावे

Description:

लोकप्रिय नेता होण्यासाठी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करणारे पुस्तकप्रस्तावना ज्याला या जगात व समाजात यशस्वी व्हायचे असेल त्याने आपल्या मित्रमंडळीत, परिवारात, कार्यालयात लोकप्रिय असले पाहिजे. लोकप्रिय होण्यासाठी लोकांचे चेहरे व त्यांची नावे लक्षात ठेवली पाहिजेत. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या लोकनेत्याला चार-पाच हजार नावे सहज लक्षात राहत असत. प्रत्येकाच्या पाठीवर थाप मारून ते त्याच्या नावाने हाक मारीत असत. लोकप्रिय होण्यासाठी अभिवादनाचे सारे प्रकार आत्मसात केले पाहिजेत. जो नेता किंवा उद्योजक लोकप्रिय होतो तोच आपले ध्येय गाठू शकतो. अंतिम ध्येय गाठण्यासाठी योग्यप्रकारच्या कार्यारंभाची गरज असते. बाकी सर्व विसरून ध्येयाकडे वाटचाल करावी लागते. ध्येयाकडच्या वाटचालीत स्वतःचे आरोग्य राखणे ही-ही गोष्ट आवश्यक असते. कितीही प्रयत्न केले तरी अनपेक्षित संकटे येतातच. त्यामुळे ध्येय गाठायला निघालेल्या माणसाला नानाविध संकटांना तोंड द्यावे लागतेच. माणसाच्या सामर्थ्याची परीक्षा संकटकाळीच होत असते. संकटकाळीच माणसाला राखीव सामर्थ्य प्राप्त होत असते. काही माणसे खूप धडपड करतात तरीही त्यांना यश येत नाही कारण त्यांनी आपल्या मनात द्वेष, मत्सर, क्रोध यासारख्या कुविचारांना आश्रय दिलेला असतो. म्हणून मनात उगवलेले कुविचारांचे तण वेळच्या वेळीच उपटून टाकायला हवे. जी तुमची मिळकत असेल त्यातून संकटसमयी उपयोगी पडावी म्हणून द्रव्याची राखीव फौज सतत शिल्लक राखायला हवी. तुमचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी या पुस्तकात शेवटी चार सोनेरी नियम दिले आहेत ते सतत तुमच्या डोळ्यासमोर ठेवायला हवे.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)