Id SKU Name Cover Mp3
प्रिय विद्यार्थी प्रिय पालक


30 72
Download Bookhungama App

प्रिय विद्यार्थी प्रिय पालक - किशोर चंद्रकांत रायपूरकर

Description:

या पुस्तकात व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग म्हणून Self Development स्वतःचा विकास आणी Self Understanding स्वतःला समजून घेणे यासाठी प्रयत्न केला आहे. निवडक माहीती संकलित करून सुसुत्र पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी तज्ञ व्यक्तींशी चर्चा, शास्त्रोक्त माहीती, इतर साहित्य व संशोधनाचा आधार घेऊन विविध मुद्दे सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे हा प्रयत्न निश्चित सर्वांना लाभदायक व उपयोगी ठरेल.प्रस्तावना   आपलं अस्तित्व कशासाठी आहे ? ही सृष्टी किंवा ब्रह्मांड हे मानवाला वेड लावणारं कायमचं कोडं आहे. अनेकांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ते पटेलच हे आवश्यक नाही. एक गोष्ट मात्र नाकारता येण्यासारखी नाही, ती म्हणजे निसर्ग हा खरोखरच अतीसुंदर आहे. त्याच्या अस्तित्वाशी तो एकरूप एकजीव झालेला आहे. त्यात मनमोहक पानाफुलांची निर्मिती, वृक्ष वेलींची निर्मिती, विलोभनीय नद्या वाहते असे तलावांची निर्मिती, भान हरपणाऱ्या पर्वत शृंखला. मोठ्या प्रमाणात वाळवंटाचा भाग, मैदानी भाग किंवा दृष्टी पडताच उर्जा देणारा शक्ती प्रदर्शन करणारा अथांग समुद्र मुक्तपणे जिथे विविध प्राणी संचार करतात तो जंगलाचा भाग. या सर्व विविध वैशिष्ट्यांनी अलंकारीत पृथ्वी व त्याला विविध ग्रहताऱ्यांनी घेरलेली एकंदरीत अकल्पनीय असे ब्रह्मांड. या सर्वात स्वतःच्या अस्तित्वाची ज्याला जाणीव आहे अशी बुद्धिमान अप्रतीम नैसर्गिक, निर्मिती म्हणजे मानव प्राणी. निसर्गात उपलब्ध असलेल्या प्रत्येक संसाधनावर नियंत्रण करणारा व त्याचा पुरेपुर मोठ्या प्रमाणात वापर करणारा प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्भुत निर्मिती होय. निसर्गाने या विशेष निर्मितीला संगणका सारखे प्रोग्राम करता येण्यासारखा मेंदू दिला आहे बुद्धिमत्ता देखील दिली आहे.   निसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय असावे ? कशाला महत्त्व द्यावे ?   या निसर्गाचा प्रत्येक घटक आहे त्या पेक्षा अधिक सुंदर व्हावा, किमान त्याला धक्का लागू नये, त्याचे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा व तसा विचार व कृती करावी. स्वतःच्या अस्तित्वाला न्याय कसा देता येईल; आयुष्य सतकारणी लावण्याची, साफल्य भावना अनुभवता येईल का हा प्रयत्न करावा. नैसर्गिक सौंदर्याचा कळस म्हणजे सार्वभौमिक प्रेम. मानवी भाव भावनाही निसर्गाची मानवाला लाभलेली देणगी आहे. परंतु ते ज्यांनी अनुभवलं त्यांनाच त्या सौंदर्याचे महत्त्व वाटले. आपसात प्रेमळ संबंध प्रस्थापित व्हावे, सर्वांनी एकमेकांचा आदर करावा, दु:ख देऊ नये या प्रकारे ही मोलाची मानवी निसर्गसपंदा जोपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने नैसर्गिक संपदा, संसाधनाचा वापर प्रभावीपणे योग्य पद्धतीने करणे अपेक्षित आहे. मानवसंसाधन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु याचा वापर मानव कल्याण, जनहितासाठी व वैश्विक शांततेसाठी अपेक्षित आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मानव समाज घडवता येईल. आदर्श समाज घडवणं हे जागतिक आवाहन आहे. सर्वांना एक ध्येय उद्दिष्ट घेउन सोबत वाटचाल करणं हे सोपे नाही. परंतु माणुसकीचा धर्म सर्वांनी आत्मसात करावा ही परिस्थिती जागतिक गरज आहे हे आपण नाकारू शकत नाही. शालेय शिक्षणातूनच याची सुरवात व्हावी व योग्य अभ्यासक्रम तयार करून ही मोहीम राबवणे याला पर्याय नाही.   व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवास जन्मताच सुरु होतो. स्वतः प्रोग्राम करणाऱ्या मेंदूमध्ये जे संस्कार दिले जातात, त्यांचा परिणाम पुढे व्यक्तिमत्त्वावर दिसून येतो. पालनपोषण लाभलेले वातावरण व वेळोवेळी घेतलेले निर्णय दिलेले प्राधान्य या विविध घटकांमध्ये विकासाची प्रक्रिया घडते. चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करावा, जेणे करून चांगले व्यक्तिमत्त्व घडेल ही अपेक्षा करता येईल. जिथे ज्या ही वयात ज्याला वाटेल तिथून देखील आत्मोन्नती प्रगती किंवा व्यक्तीचा विकास घडू शकतो. प्रत्येक आयुष्यात निसर्गाला पोषक असणारी ध्येय उद्दीष्टे ठरवावी व त्या प्रमाणे वाटचाल करावी. या साठी स्वतःला समजून घेणे व व्यक्तिमत्त्व विकास घडवणे याला पर्याय नाही.   दु:ख आणि वेदनेच्या अनुभवा शिवाय खऱ्या अर्थाने सुखाची अनुभूती फारसा आनंद देऊ शकत नाही. वाईट आहे म्हणून चांगल्याचे महत्त्व कळते. आयुष्यात विविध भूमिका करत असतांना तर्कयुक्तपणा महत्त्वाचा आहे. पण नुसता तर्क नसावा, त्याला नैतिकतेची जोड असावी. चांगले आणि वाईट याचे भान ठेवून समाजात सहभागी व्हावे. चांगला समाज घडवण्यासाठी चांगली माणसं हवीत. चांगली माणसं म्हणजे निसर्गाला, समाजाला जोपासणारी, मानवी जीवाचा प्राणाचा मोल समजणारी व त्यांच्या कल्याणासाठी झटणारी. समाजात काही व्यक्ती अतिशय समंजसपणे वागतात. त्याच्या चालण्या बोलण्यातून देखील परिपक्वता दिसून येते. फक्त दिसून येत नाही तर त्यांनी परिपक्वतेची अवस्था मिळवलेली असते. अशा काही व्यक्तीच कां ? प्रत्येकांनी परिपक्व व्हावे व समाजाच्या प्रगतीसाठी स्वतःच्या कल्याणासाठी हातभार लावावा. यासाठी शिक्षणाची गरज आहे. किंबहुना युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागतील. (युद्ध करून नव्हे)   अनेक मान्यवर नावाजलेली व्यक्ती शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत. प्रामुख्याने व्यावसायिक शिक्षण देण्यात. याच सोबत सामाजिक व मानस शास्त्रीय शिक्षणाला महत्त्व देणे ही काळाची गरज आहे. मानसिक आरोग्य चांगले असेल तर समाजात विधायक कामे घडतील व अपेक्षित असे स्वर्गीय चित्र जागतिक पातळीवर दिसले. विविध प्रकारे लोकांना सुशिक्षित करण्याचे कार्य होत आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. ज्ञानाची सीमा आखता येत नाही ते अमर्याद आहे. परंतु समाज सुसंस्कृत व सुदृढ असा घडवण्यासाठी थोडे अधिक व वेगळे प्रयत्न अपेक्षित आहेत. शिक्षणाच्या प्रक्रियेत स्वतंत्रपणे अभ्यास करता येण्याची पात्रता निर्माण होण्यापुरते ज्ञान दिले गेले पाहिजे. जीवन जगण्याची कला आत्मसात झाली पाहिजे. निव्वळ पोटाची खळगी भरून शरीराला जगवणे नव्हे; तर समाजमान्य किंवा स्वतःचा आत्मसन्मान अबाधित राहील अशा पद्धतीने. शारिरिक व मानसिक आरोग्य चांगले असलेले नागरिक घडले पाहीजे. या दिशेने प्रयत्न अपेक्षित आहेत.   या पुस्तकात व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग म्हणून Self Development स्वतःचा विकास आणी Self Understanding स्वतःला समजून घेणे यासाठी प्रयत्न केला आहे. निवडक माहीती संकलित करून सुसुत्र पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी तज्ञ व्यक्तींशी चर्चा, शास्त्रोक्त माहीती, इतर साहित्य व संशोधनाचा आधार घेऊन विविध मुद्दे सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे हा प्रयत्न निश्चित सर्वांना लाभदायक व उपयोगी ठरेल.   सस्नेह आपला   किशोर चंद्रकांत रायपूरकर  


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि