Id SKU Name Cover Mp3
पेशवाईतील सुरसकथा


60 116
Download Bookhungama App

पेशवाईतील सुरसकथा - जयन्त खरे

Description:

या पुस्तकामधील गोष्टी वाचताना त्या काळच्या माणसांचे, समाजाचे, राज्यकर्त्यांचे, विद्वान पंडितांचे दर्शन आपणास घडेल. या गोष्टींमधला बराच भाग इतिहासाशी निगडित आहे आणि काही गोष्टी त्यावेळच्या समाजात दंतकथेच्या रूपाने निर्माण झाल्या, काही गोष्टी तिखटमीठ लावून रोचक केल्या गेल्या. मुलांना या गोष्टी तरीही आवडतील अशी आशा आहे. या गोष्टींसाठी मी स्वतः अनेक चित्रे रेखाटली आहेत. मी ऐतिहासिक चित्रांचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे त्यावेळचे पोशाख, पगड्या, शस्त्रे, हत्ती-घोडे, पार्श्वभूमीच्या इमारती, शक्यतो यथातथ्य काढल्या आहेत. आज एकविसाव्या शतकातील अतीव यांत्रिक सुधारणा आणि त्या काळचा मागासलेपणा यात जमीन-अस्मानचा फरक आहे. जेवढ्या गोष्टी मिळाल्या, त्या दोन पुस्तकांच्या रूपाने मुलांसाठी इतिहासाची आवड वाढवण्यासाठी लिहिल्या आहेत. आपल्या बाळ-गोपाळांना त्या आवडतील अशी आशा करतो.प्रस्तावना शिवरायांनी पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरून परत एकदा हे ‘पुनवडी’ खेडे वसवले. नंतर प्रतापी बाजीराव पेशव्यांनी ‘पुणे’ हे मराठी सत्तेचे ठाणे करून पुण्यात आपला वाडा बांधून भारतभर पराक्रमाने अनेक प्रदेश काबीज करून भारतभर पुण्याची माहिती करून दिली. थोरले माधवराव आणि सवाई माधवरावांची कारकिर्दीत पुण्यास वैभवाचे दिवस आले. पुणे दरबारचा धाक साऱ्या हिंदुस्थानभर जाहीर झाला. दुसरे बाजीरावाचे कारकिर्दीत भारताच्या पत्रिकेत दीडशे वर्षे अभद्र ग्रहांची युती झाली. टिपू सुलतान मारला गेला. निजामाने तैनाती फौज स्वीकारली. मराठ्यांचा सर्वत्र पराभव झाला. दिल्लीचा बादशहा कैद होऊन ब्रह्मदेशात वनवासी झाला. इंग्रजांनी १५० वर्षांत पेशव्यांच्या व मराठ्यांच्या शौर्याची नावनिशाणी पुसून टाकली. पुण्यातील पेशव्यांचे तीनही वाडे जाळून टाकले. ज्या शनिवारवाड्यातील कचेरीत दोन-तृतीयांश हिंदुस्थानचा राज्यकारभार चाले तेथे फक्त एक-दोन बराकीत हवेली तालुक्यांची मामलत राहिली. पुण्याच्या फक्त एका रस्त्याला थोरले बाजीराव रस्ता हे नाव राहिले. पर्वतीवर तीन देवळे आणि बेचिराख शनिवारवाड्यात तेथील इमारतींचे ओटे आणि त्यावर वाढलेले गवत एवढाच पेशव्यांचा इतिहास पुण्याच्या नव्या पिढीला ज्ञात आहे. आणि एक दिवस योगायोगाने मी पर्वतीस काही निमित्ताने जेवावयास गेलो. तेथे पेशवे संग्रहालयाबद्दल सूचक बोलणी सुरू झाली. पर्यटकांच्या दृष्टीने ती सोयीची आहे असे वाटले.श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड या ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी संग्रहालय करण्याचे ठरविले. श्रीकृपेने ही संपूर्ण जबाबदारी त्यांनी मजवर सोपविली व अर्थसाहाय्य अजिबात कमी पडू दिले नाही. पर्वतीवर पेशवाईतील शूर पुरुषांची आठवण करून देणारा इतिहास, चित्ररूपाने, वास्तुरूपाने, वस्तुरूपाने उभारण्याचा आम्ही सर्वांनी एकदिलाने प्रयत्न केला. त्यामुळे पेशवे संग्रहालयाची देखणी इमारत, आतील संग्रहालयासह उभी राहिली आहे. त्या वेळी मराठ्यांच्या इतिहासाचे, बखरींचे बारकाईने वाचन करावे लागले. महाराष्ट्रभर ऐतिहासिक वस्तू मिळविण्यासाठी हिंडावे लागले. त्यावेळेपासून पेशवाईतील अद्भुत कृत्ये, नवलकथा, दंतकथा, त्यांच्या नावावर त्या वेळी सांगितल्या जाणाऱ्या कथा, म्हणी, काव्ये, नव्या पिढीसमोर यावीत व त्यांना आपल्या पूर्वजांच्या धैर्याचे, विजयाचे व त्या वेळच्या राजनीतीचे कूट प्रश्न माहीत व्हावेत ही कल्पना मनात बरेच दिवस रुजली होती. शिवशाही आणि पेशवाई कालखंडाचा इतिहास त्या काळच्या लेखकांनी बखरवाङ्मयाच्या रूपात लिहिला. त्या लिखाणालाही दोन-अडीचशे वर्षे होऊन गेली. इंग्रजांचे राज्य आले आणि गेले. त्यावेळच्या बोलीभाषेतही बराच फरक पडला. आपल्या देशाचा, राज्याचा इतिहास वाचावयास खूप जणांना आवडतो. त्यावेळच्या घडलेल्या गोष्टींवरून शिकण्यासारखे खूप असते. या ठिकाणी सांगितलेल्या गोष्टी २०० ते २५० वर्षांपूर्वीच्या आहेत. शिवाजीच्या काळातील नाहीत. औरंगजेब बादशहानंतर मोंगल साम्राज्य खिळखिळे झाले. थोरले बाजीराव, चिमाजीअप्पा, महादजी शिंदे, नागपूरकर, भोसले, आंग्रे यांनी मोंगल साम्राज्याला धडका मारून त्या राज्यकर्त्यांना धडकी भरवली.  जयन्त खरे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि