Id SKU Name Cover Mp3
परिवर्तन


30 76
Download Bookhungama App

परिवर्तन - अनुताई भागवत

Description:

“परिवर्तन” हा तपोवन संस्थेचा इतिहास. जिवंत मनाने लिहीलेला जिवंत इतिहास दि.२६/९/१९४६ हिंदुस्थानचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी तपोवनाच्या बिजाचे रोपण झाले. बीज अंकुर लागले.प्रस्तावना “परिवर्तन” हा तपोवन संस्थेचा इतिहास. जिवंत मनाने लिहीलेला जिवंत इतिहास दि.२६/९/१९४६ हिंदुस्थानचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी तपोवनाच्या बिजाचे रोपण झाले. बीज अंकुर लागले. गांधीजींच्या आदेशातून आकाशाला भिडणाऱ्या आवाजातून गांधींजींच्या जीवनातील अपुर्ण राहिलेल्या कार्याला पुर्णत्वाकडे नेणारा मनोसंकल्प पंडित परचुरे शास्त्रीच्या रूपाने प्रातिनिधीक स्वरूपात कुष्ठसेवेची बिजे अंकुरलीत. डॉ. शिवाजीरावांच्या वैद्यकीय सेवेतून ३०० एकर शेतीचं दान. बळीराजाने वामनाला दिलेल्या दानापेक्षा कमी प्रतीचे दान नव्हतं. दोन्हीत साम्यता एकच. ते तीन पावलांचे दान होतं. हे ३०० एकराचं दान होतं. माळरानावर साकारलेलं नंदनवन तपोवन. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, विनोबा भावे यांचा मिळालेला आशिर्वाद. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी आवाहन केले:- कुष्ठरोग्यांचे जीवन, ओंगळ, कुरुप, अनैतिक हे समीकरण गाडून टाका. त्याचे स्वरूप सत्य, शिव, सुंदर बनवा. इथ येणाऱ्या प्रत्येक रोग्याला आलेल्या कुरुपतेला सौंदर्यांचे रुप द्यायचे आहे. व समाजात ताठ मानेने जगायचे आहे. हा महामंत्र घेऊन दाजीसाहेबांनी संस्थेतील कुष्ठरुग्णांना मानवतेची पताका, फादर डेमीयन ह्यांच्या आर्त स्वरांना साथ देण्यासाठी वैश्विक दिंडीची साद घातली. आणि त्यातूनच साकारलं, अनुताई भागवताचं परिवर्तन. वेदना बोलली, ओरखडा उठला आणि साकारलं परिवर्तन. अनुभवाचे बोल, कुष्ठरुग्णांची स्थिती मानवतेला हेलावून सोडणारं कारुण्य. स्वातंत्र्यपूर्व लढ्यापासून तर भारतात हा कुष्ठकायदा संपुष्टात आणण्या पर्यंतचा इतिहास लेखिकेने सिद्धहस्ताने चितारला आहे. त्या महादेवी वर्माच्या शब्दात म्हणतात:- पीडासे मेरे प्राणोंकी सीमाका विस्तार हुवा है। पीडामें तुम मिले मुझें जब, पीडित जनसे प्यार हुवा है।। कुष्ठरोग हे पाप नाही. गुन्हा तर नाहीच नाही. रोग समस्या ही एक तपस्या. जी ज्याची त्यालाच करायची आहे. तेव्हाच मानवता निर्माण होईल. परमेश्वराने भारताला शापमय आशिर्वाद दिला आहे. “जगाला मानवतेची दिशा देशील तरच तुझा उद्धार होईल.” संवेदना निर्माण झाल्या की मानवता प्रगट होईल. रोगी, भोगी, अनाथ, अपंग, वेदनांची गाठोडी बांधून आंनदाचा स्वर्ग या माळरानावर फुलवला. ही खरं तर डॉ. शिवाजीराव पटवर्धन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमातून साकारलेली ही घामाची फुलं आहे. कुष्ठवसाहतीचं बकाल स्वरूप त्यांनी अनुभवलं. इथे जिवंत मृत्यूचा शोध लागला आणि त्यातून एक एक कल्पना साकारत गेल्या. संवेदनशील नेत्यांनी, समाजसेवकांनी खारीचा वाटा उचलला आणि तपोवनच्या रचनेत मोलाचे सहकार्य केले. महिलांचे प्रश्न मार्गी लागले. अनाथांच्या वेदनांना वाचा फुटली. बंदिगृहात खितपत पडलेल्या कुष्ठरोग्यांवर उपचार होऊ लागले. त्यांना मुक्त आसमंतात श्वास घेता येऊ लागला. अनेक कुष्ठबंद्यांच्या जीवनाला नवा आकार मिळाला. डॉ. शिवाजीरावांचा कुष्ठबंद्यांचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. आणि कुष्ठबंद्यांना नव जीवन मिळाले. अनुताई भागवतांनी परिवर्तन या पुस्तकात संस्थेतील कुष्ठरोगी जीवनाचे अंग न अंग पानापानातून चितारले आहे. जीवनाच्या अखेरच्या वळणावर सुटणारी साथ संगत आणि पूज्य दाजीसाहेबांचा संस्थेला निरोप. सोसूनी झाल्या झळा, शिशिराची पानगळ। अाता उन्मेष फुलांचा, पानोपानी सळसळ।। गाणं जगणं नव्याने, गातो प्रेमात वसंत। उन्हामध्ये तापूनही, मोहावती अासमंत।। सृष्टी उधळत रंग, उन वाऱ्याला सोसून। व्हावे जगणं असेच, सारे आसवे पुसुन।। सारे मिळूनी संगती, चढ चढणे वळण। चैत्र पाडव्याला मुक्त, जगण्याची उधळण।। समाजात प्रस्थापित झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया. या नव निर्माणाची आरंभ गुढी पाडव्याच्या पहाट पाडव्या सारखीच आहे. आम्ही असे घडलो. हा वसा बरंच काही सांगून गेला. पण संघर्षाच्या पाऊलखुणा उमटवूनच. देवांगणा भुमरकर हिने आपल्या भावना व्यक्त करतांना भावनेच्या भरात गुरफटणार नाही. मिळवायच आहे. आपल्याला ह्या आठवणीतून खंबीर राहायचे आहे. हे देखील विसरणार नाही. संघर्ष चालूच राहील. तिने समाजाला हे ठणकावून सांगितलं आहे. अनेकांची मनोगते समुद्रात खोलखोल जाणाऱ्या शरीराचा वेध घेणाऱ्या अंधाऱ्या गुहेसारखे आहे. त्याचा शोध घेण्याचा अनुताईचा हा नम्र प्रयोग व प्रयत्न. त्यांच्या परिवर्तनाला शतशः अभिवादन. डॉ. मोतीलाल राठी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि