30 50
Download Bookhungama App

परिश्रम आणि मेहनत - ह. अ. भावे

Description:

परिश्रम आणि त्याचे उपयोग जाणून दुसऱ्यासाठी कष्ट करा उपयोगी व निरुपयोगी श्रम यातला फरक ओळखून आशावादी रहा ढोर मेहनत न करता हसत केलेले श्रम करत आळस पळवून लावा आणि जीवन सार्थकी लावा असा मोलाचा सल्ला यात दिलेला आहे.प्रस्तावना परिश्रम हा गुणधर्म मानवतेशी जोडलेला आहे. माणसाप्रमाणे इतर, प्राण्यांनाही अन्न मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. अन्न व अ¬न्य गरज निर्माण होते म्हणूनच माणूस श्रम करतो 'गरज ही शोधाची जननी आहे' ही म्हण अगदी सार्थ व सत्य आहे. अनेक माणसांना श्रम करावेसे वाटत नाही कारण त्याला श्रम करण्याची गरज वाटत नाही. परंतु माणसाने किंवा प्राण्याने श्रम करणे हे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. ह्या निसर्गात जो प्राणी किंवा माणूस श्रम करणार नाही. तो उपाशी मरेल. नव्याने जन्मलेले बालक असतं त्याच्या अन्नाची सोय निसगनि केलेली असते. नवजात बालकाला दूध कसे प्यायचे हे शिकवावे लागत नाही. ही कला त्याला जन्मजातच मिळालेली असते. तरीही बालकाला आपले अन्न मिळवण्यासाठी ओठ तरी हलवावे लागतात. जगण्याच्या खटपटीतून माणसाने अनेक श्रम केले. त्यातूनच ही मानवी संस्कृती निर्माण झाली. पे श्रम मानवाने केले नसते तर आजही माणूस इतर पशुंप्रमाणे रानात फिरताना दिसला असता. किंवा त्याने जास्तीत जास्त गुहेत मुक्काम केला असता. चालणाऱ्याचे भाग्य चालते जरा निसर्गाकडे पाहूया. सूर्याचा सारथी अरुण उदयाचलावर येतो. सर्वत्र प्रकाश-किरणे पसरू लागतात. रात्री दिसणार तारे आता दिसेनासे होतात. घरट्यात झोपलेले पक्षी आता जागे होतात. आपल्या मधुर स्वरात आवाज काढू लागतात. पृथ्वीवर प्रकाश पसरतो आणि प्रभात होते. प्रभात- काळचे थंडगार वारे सुटलेले असतात. सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. त्या प्रभातकालीन सुखद वातावरणामुळे आपल्या मनातही प्रसन्नता आणि सुख भरून जाते. अशाप्रकारे आपल्या जीवनातील प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रसन्न व सुखद वातावरणात होते. दिवसभर प्रकाश फैलावण्याचे आपले काम सूर्य करीतच असतो. संध्याकाळ झाल्यावरच सूर्य पश्चिमाचलावर दाखल होतो आणि विश्रांतीसाठी क्षितीजापलिकडे बुडी मारतो. उपनिषदात म्हटले आहे- ''झोपणाऱ्याचे भाग्य झोपते आणि चालणाऱ्याचे भाग्य चालत राहते. चराति चरतो भग ! ” जो चालत राहतो त्याचे जीवन सफल होते. चालत राहणे याचा अर्थ परिश्रम करणे आपल्याला तहान लागली की पेला उचलून तो तोंडाला लावावा लागतो तेव्हा पाणी मिळते. जगण्यासाठी आपण श्वास घेतो त्यालाही श्रम पडतातच. तेव्हा परिश्रम व तुमचे जीवन एकरूप झालेलेच आहे. अर्थात परिश्रमाचे प्रकार अगणित आहेत. परिश्रमात दुःख नाही. परिश्रम केल्यामुळे सुख व संतोष मिळतो. भरपूर श्रम केल्यानंतर जी विश्रांती मिळते, त्या विश्रांतीची चव काही न्यारीच असते. परिश्रम केल्यामुळेच माणसाच्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात.


Format: ePub

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)