Id SKU Name Cover Mp3
पालवी - भाग १


60.00 116.00
Download Bookhungama App

पालवी - भाग १ - स्वाती धर्माधिकारी

Description:

लहान मुलांचे शोषण ही जागतिक समस्या आहे.. भारतात हि समस्या जास्तच तीव्र आहे. हे पुस्तक ह्या समस्येचा मागोवा घेते आणि पुढील दिशा दिग्दर्शन करते.

Child Abuse is rampant all over the world. In India it is even more severe. This book highlights issues related to child abuse and proposes way forward."प्रकाशकाचे मनोगत

 “पालवी” हे पुस्तक आपल्या पुढे ठेवताना “सृजन” ला खूप आनंद होत आहे.  प्रा. स्वाती धर्माधिकारी आपल्या मनोगतात सुरुवातीलाच असे म्हणतात कि “ज्यांना मायेचे लोक कमी , किंवा नाहीतच व ज्यांना विशेष काळजी ची देखभाली ची गरज असते अशा बालकांच्या केसेस समोर मांडण्यामागे केवळ सनसनी पैदा करणे, काही तरी हटके सांगणे हा उद्देश नसून या परिस्थितीतल्या बालकान कडे लक्ष द्यायला हवंय हे अधोरेखित करायचा हा प्रयत्न पालवी द्वारे करावा हे ठरलं”  

मला इथे प्रा. माधवी भट ह्यांनी श्रध्येय बाबा आमटे ह्यांचे एक महत्वाचे विधान सांगितले होते ते आठवते आहे...बाबा म्हणायचे “महारोगी सेवा समितीच्या आनंदवनाच्या माध्यमातून अनेक कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन झालं हे जरी खरे असले तरी खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा आनंदवन पुन्हा निर्माण होणार नाहीत”.  

समाजाची ही स्थिती यावी असे आपल्याला वाटत असेल तर पालवी हे केवळ एक पुस्तक न रहाता ती एक चळवळ व्हावी...अशी सृजन ची रास्त अपेक्षा आहे.   

प्रा. स्वाती धर्माधिकारी ह्या केवळ मानसशास्त्रज्ञ नाहीत, त्या केवळ प्राध्यापिका नाहीत...त्या केवळ समुपदेशक सुद्धा नाहीत...तर त्या एक सजग सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी महत्व पूर्ण भूमिका बजावली आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या व्यापक अनुभवाचा सृजन च्या वाचकांनी खूप उपयोग करून घ्यावा ह्या साठी “पालवी” दोन भागात आपल्या समोर ठेवताना सृजन आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी सुद्द्धा निभावत आहे.  

सृजन


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि