30.00 58.00
Download Bookhungama App

पालकांचे पाठ्यपुस्तक - सी. एम. जगदाळे

Description:

प्रत्येक पालकांच्या आपल्या पाल्यासंबंधी, मुलासंबंधी काही समस्या असतात; काही तक्रारी असतात. त्या व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या असल्या तरी काही समस्या ह्या आपल्या सर्वांच्याच आहेत. त्या समस्या कोणत्या आहेत. त्या समस्यांवर कोणती उपाययोजना शक्य आहे. ह्याचा विचार या पुस्तकात केला आहे.पालकनामा

प्रत्येकजण पालक असतो. पालकांचा जो पाल्य असतो, तो पुढे पालक होतो. अशी वंशपरंपरा गंगेच्या प्रवाहाप्रमाणं वाहात असते. पाल्य-पालक-पाल्य ही न थांबणारी प्रक्रिया. त्यामुळेच त्यांचे आपआपले प्रश्न काळानुरुप बदलत आले. पण वंशपरंपरा जशी थांबली नाही; तसे प्रश्नही थांबले नाहीत.

प्रत्येक पालकांच्या आपल्या पाल्यासंबंधी, मुलासंबंधी काही समस्या असतात; काही तक्रारी असतात. त्या व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या असल्या तरी काही समस्या ह्या आपल्या सर्वांच्याच आहेत. त्या समस्या कोणत्या आहेत. त्या समस्यांवर कोणती उपाययोजना शक्य आहे. ह्याचा विचार या पुस्तकात केला आहे.

मी स्वतः एक पालक असल्यानं, इतर पालकाप्रमाणं मलाही त्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. आजूबाजूची परिस्थिती झपाट्यानं बदलत असल्यानं, आणखी नवीन समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या करणे आणि आपल्या मुलांना जीवन जगण्यास समर्थ बनविणे हे आपले कर्तव्य आहे.

सध्याच्या परिस्थितीतपालकम्हणून आपण काय करू शकतो? याचा विचार मी पुस्तकात केला आहे. त्यामुळेपालकांचे पाठ्यपुस्तकसर्वच पालकांना मार्गदर्शक ठरू शकेल अशी माझी खात्री आहे.

मी स्वतः एक शिक्षक असल्याने मला मुलांच्या अनेक तक्रारींना तोंड द्यावे लागते. अनेक पालक आमच्याकडे तक्रार करतात, ‘मुलगा आमचं ऐकत नाही! तुमचं ऐकलं तर बघा.’ जी मुले आपल्या पालकांचं ऐकत नाहीत, ती मुले शिक्षकांचं तरी ऐकतील कशावरून? पण त्या पालकांची तशी अपेक्षा असते. पण आपल्या आईबाबांचं न ऐकणाऱ्या मुलांनी शिक्षकाचं तरी का ऐकावं? याचा कोणी विचार करीत नाही.

मुलांच्या यशापशाला सर्वस्वी शिक्षकालाच जबाबदार धरले जाते. पण त्याच्या यशापशाला सर्वस्वी शिक्षकच जबाबदार आहे का? त्या मुलावर फक्त शिक्षकचप्रभावटाकतो का? त्या बालकावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो. याचा विचार या पुस्तकात केला आहे. बालकाच्या विकासात कोणते अडथळे येतात याचाही विचार केला आहे. पालकांच्या समस्या, त्यावर कोणते उपाय करणं पालकांना शक्य आहे, थोडक्यात, पालक काय काय करू शकतात? हे सांगणारं हे पुस्तक आहे.

आज समाजात अनेक चांगल्या-वाईट गोष्टी आहेत. वाईट गोष्टींपासून आपण आपल्या मुलांना वाचविलं पाहिजे. आपल्या मुलाचं कशाकशापासून, कोणा कोणापासून संरक्षण केलं पाहिजे, याचं मार्गदर्शन हे पुस्तक करणार आहे. संकटं अनेक आहेत. समस्या, अडचणींचे डोंगर आहेत. पण संकटाच्या अनिश्चिततेच्या अंधाऱ्या मार्गावर आपल्याबरोबर घेऊन चालणाऱ्या पालकांना, त्यांच्याबरोबर चालणाऱ्या पाल्यांना प्रकाश दाखविणारं हे पुस्तक, प्रत्येकाच्या हातात असलंच पाहिजे. ते तुम्हाला जरूर मार्ग दाखवेल.

माझ्या माहितीप्रमाणं पालकांसाठी लिहिलेले हे पहिलेच पाठ्यपुस्तक असावे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासाठी हे जरूर वाचावे. आज जे पाल्य आहेत. ते उद्या पालक होणार आहेत. म्हणून आजच्या पालकांनी आणि उद्याच्या पालकांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे.

जर माझ्या समस्या आणि तुमच्या समस्या एकच असतील तर तुम्हाला हे पुस्तक जरुर आवडेल. एका पालकाने पाल्यांच्या पालकासाठी पाठविलेपालकांचे पाठ्यपुस्तकपोहचल्यावर पुस्तकाची पोहोच द्यायला विसरु नये. तुमच्यासारखाच... एक पालक.

सी. एम्. जगदाळे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि