40.00 98.00
Download Bookhungama App

पहावे जरा मरून - डॉ. पी. एन. कुंभारे

Description:

काही वर्षांपूर्वी मी एक वाक्य वाचले होते. त्याचा लेखक आठवत नाही, परंतु ती ओळ अशी होती; प्रत्येक क्षणाला मृत्यू जवळ येत आहे, मृत्युची आठवण करा म्हणजे पाप होणार नाही.’ या वाक्याकडे कोणाचेही गांभीर्याने लक्ष गेले नाही, त्यामुळे तुम्ही-आम्ही नकळतपणे पापभीरू राहता पापी होत चाललो आहोत. काही वर्षांपूर्वी मी एक वाक्य वाचले होते. त्याचा लेखक आठवत नाही, परंतु ती ओळ अशी होती; प्रत्येक क्षणाला मृत्यू जवळ येत आहे, मृत्युची आठवण करा म्हणजे पाप होणार नाही.’ या वाक्याकडे कोणाचेही गांभीर्याने लक्ष गेले नाही, त्यामुळे तुम्ही-आम्ही नकळतपणे पापभीरू न राहता पापी होत चाललो आहोत. एक गोष्ट नक्कीच खरी की मृत्युला जर दुःख समजले, तर त्याच्यामुळेच आनंद आणि विनोद निर्माण होत असतात. सुप्रसिद्ध विनोदी लेखक मार्क ट्वेन याने म्हटलेच आहे की, बहुतेक विनोदांची निर्मिती दुःखामधूनच होत असते. स्वर्गामध्ये दुःखच नसल्यामुळे तेथे विनोद नाही. आहे की नाही गंमत!

माझ्या चौथ्या मराठी पुस्तकाचे शीर्षकपहावे जरा मरूनहे निवडण्यामागे माझा हेतू हाच आहे, की, मरणाच्या कल्पनेमधून थोडाफार विनोद किंवा थोडाफार चटकदारपणा निर्माण करावा आणि वाचकांना फारसे अंतर्मुख न करता, त्यांचे मनोरंजनही करावे. यातील निम्म्या कथा तशी ती स्फुटेच आहेत. मरणाच्या जाणिवेशी निगडित आहेत. ‘तीन वेळा आलेली मरणाची संधीही गोष्ट लोकसत्ताच्या चतुरा पुरवणीमध्ये प्रकाशित झाली. (एप्रिल २००५) आणि त्यानंतर मला खूप दूरध्वनी आणि पत्रे आली. त्यातल्या अनेक वाचकांनी असे लेख समाविष्ट असलेले पुस्तक प्रसिद्ध करावे, अशी आग्रहाची सूचना केली.

ढोबळमानाने प्रत्येक व्यक्ती दररोज मरणाचा अनुभव घेत असते. कारण ती झोपेत असते. काही व्यक्तींना डॉक्टरमंडळी ऑपरेशनपूर्वी भूल देऊन झोपवतात, त्या वेळी त्या व्यक्ती मृत्युच्या अगदी जवळ गेलेल्या असतात. पुण्यातले सुप्रसिद्ध डॉक्टर ज्यांचा पुनर्जन्मावर नितांत विश्वास आहे, तेच डॉ. . वि. वर्तक म्हणतात की, “१९९४ साली मला हृदयविकार झाला व त्यासाठी हृदयरोहिणीत बदल करण्याचे ऑपरेशन माझ्यावर केले. तेव्हा माझे हृदय काही तास बंद केले होते व मग पुन्हा ते चालू केले. साहजिकच माझा पुनर्जन्म झाला, असे सगळेच म्हणू लागले.” माझ्या मते त्यांनीपहावे जरा मरूनचा अनुभव घेतला असावा.

शेरविन नुलंड हा अमेरिकेतील येल विद्यापीठात नामांकित सर्जन आणि प्रोफेसर आहे. त्याने त्याच्या Wisdom of The Body या गाजलेल्या पुस्तकात त्याला आलेला एक संस्मरणीय अनुभव नमूद केला आहे. वैद्यकीय व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात हॉस्पिटलमध्ये एक चाळिशीच्या आसपासचा पेशंट कोठला तरी आजार घेऊन येत असे. हॉस्पिटलमधून निघण्यापूर्वी तो एका बाकावर बसत असे. परंतु लोकांचे लक्ष आपल्याकडे जाईल, याची दक्षता घ्यायचा आणि नंतर एक नाट्यपूर्ण घटना घडत असे. तो बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळत असे. डॉक्टर आणि नर्सेसची धावपळ सुरू व्हायची. कारण त्याची नाडी आणि श्वास थांबलेला असे. अंगही निळसर पडत असे. मात्र थोडा वेळ छातीवर बाहेरून मसाज केला की, तो पूर्ववत होत असे. नवशिके डॉक्टर अथवा नर्सेस मग सुटकेचा निःश्वास सोडत असत.

 

मला स्वतःला सात-आठ वर्षांपूर्वी दिवसातून एकदातरी एक विलक्षण अनुभव येत असे. जवळजवळ पंधरा ते वीस सेकंद मला सर्व काही थांबत चालल्याची जाणीव होत असे, आणि मी घाबरून जात असे. एकदा मात्र मी नाडीचे ठोके मोजत असताना हा अनुभव आला आणि त्या वेळी लक्षात आले की, ठोके थांबलेले आहेत. जवळजवळ दोन-तीन वर्षे मी हा अनुभव दिवसातून एकदा तरी घेत असे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि