Id SKU Name Cover Mp3
Onkarmay Vha


20.00 48.00
Download Bookhungama App

ओंकारमय व्हा - दुर्गानंद गायतोंडे

Description:

अध्यात्मात जे काही तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते त्या वेळच्या समाजाला अनुसरून होते. समाज सारखा बदलत असतो आणि त्याप्रमाणे तत्त्वज्ञान बदलणे गरजेचे आहे.मी संशोधनाचा भोक्ता आहे, म्हणून मला संशोधनाची आवड आहे. सर्व शास्त्रांत आणि विज्ञानात संशोधन सतत चालू असतं; पण अध्यात्मात तसं काही दिसून येत नाही. एखादा अपवाद असेलही, पण त्यांनी जे काही निष्कर्ष काढलेले असतील ते काही माझ्या वाचनात आले नाहीत. अध्यात्मात जे काही तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते त्या वेळच्या समाजाला अनुसरून होते. समाज सारखा बदलत असतो आणि त्याप्रमाणे तत्त्वज्ञान बदलणे गरजेचे आहे. समाज कसा बदलत जातो याबद्दल एक दंतकथा आहे ती अशी :

ही कथा २०१५ सालची आहे. एका गांवी हनुमानाचे देऊळ होते. त्या देवळाचा पुजारी हनुमानाचा परमभक्त होता. तो रोज सकाळी, दुपारी आणि रात्री हनुमानाची पूजा करायचा. एका रात्री पाहातो तो देवळातली मूर्ती गायब झाली होती. पुजारी हवालदिल झाला. तेथेच तो ध्यान करीत बसला. काही वेळाने त्याला हनुमानाचा आवाज ऐकू आला : “अरे माझ्या भक्ता, मी रागावून हिमालयात निघून गेलो आहे.” पुजारी म्हणाला, “देवा माझ्याकडून काही चूक झाली आहे का? तसं असेल तर मला क्षमा कर.”

हनुमानाचा आवाज ऐकू आला : “तू माझा परमभक्त आहेस. तुझ्या हातून काहीही चूक झालेली नाही. तू मला भेटायला ये. तेव्हा मी का रागावलो आहे हे तुला सांगेनआणि त्याप्रमाणे हिमालयात कुठं भेटायचे ते हनुमानाने पुजाऱ्याला सांगितले. पुजारी आपल्या देवाला भेटायला हिमालयात गेला. देव भेटल्यावर त्याने साष्टांग नमस्कार घातला. हनुमान म्हणाले, “भक्ता, तुझे कल्याण असो. आता मी का रागावलो हे सांगतो; सत्ययुगात माझी अनेक देवळे होती आणि हजारो भक्त होते. द्वापारयुगात देवळेही कमी झाली आणि भक्तही कमी झाले आणि आता कलियुगात तर कहर झाला. नावापुरतीच देवळे उरली आणि नावापुरतेच भक्त राहिले आहेत. परवा रात्री तर कहरच झाला. एक चोवीस वर्षांची मुलगी देवळात आली आणि मला म्हणाली, “हाय हनु!”

समाज किती बदलला आहे, या दंतकथेवरून दिसून येते. मी पुनर्जन्मावर संशोधन करूनपुनर्जन्मा ऐक तुझी कहानीहे पुस्तक प्रसिद्ध केलं आत्मा पुनर्जन्म घेत नाही. तर विचार घेतात हे प्रतिपादन मी केलं. यावर मला बरेच अभिप्राय आले आणि त्या वाचकांनी माझ्या सिद्धांताला अनुमोदन दिले.

आता मी ॐवर संशोधन केलं आहे. हे खरं तर शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. ते मी पेलेल की नाही ते वाचकच ठरवतील. एका सद्गृहस्थाने जे माझ्या संशोधनात सामील झाले आहेत त्यांनी हे संशोधन गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. ते लिहितात, “माझे बरेचसे प्रश्न खालील प्रकारचे आहेत.

“Have you stopped beating your wife Yes/ No.” असो.

एका सद्गृहस्थाने सर्व प्रश्नांची उत्तरे होकारात्मक दिली आहेत. त्यावरून वाटतं की त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असावा.

माझ्या ५६ प्रश्नांची उत्तरे एकूण ३५ सहभागी झालेल्यांनी दिली आहेत आणि त्यावरून मी जो निष्कर्ष काढला आहे, तो या पुस्तकात दिला आहे.

मला आता डोळे साथ देत नाहीत तेव्हा कदाचित हे शेवटचे पुस्तक असायला पाहिजे होते; परंतु माझे मित्र श्री. सुनील नेवाळकर यांनी पुस्तक लिहिण्यात मोलाची मदत केल्याने हे आता प्रसिद्ध होणार आहे. हा योगायोग नाही. ही ॐची कृपा आहे.

 

-दुर्गानंद गायतोंडे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि