60.00 116.00
Download Bookhungama App

ओघळांचे नकाशे - सी. एल. कुलकर्णी

Description:

विविध सामाजिक छटांचे हे नकाशे आपल्या अवलोकनासाठी.मनोगत

माणूस कितीही आत्मकेंद्रित असला तरीही, परमेश्वराने मनावर कोरलेल्या एका पैलुमुळे, आजूबाजूच्या घटनांची प्रतिबिंब त्यावर उमटतात. आनंदाची वलयं जितक्या वेगाने उमलतात तितक्याच वेगाने मिटतातही पण व्यथांच्या लाटा अक्राळ विक्राळ रूप घेऊन दीर्घकाळ आपले ठसे काठावर ठेवून जातात. म्हणून जगात सुख राई एवढे आणि दुःख पर्वताएवढे असते असं म्हणतात.

एखाद्या ठिकाणी खड्डा पडला की कुठेतरी त्यातून सुटलेल्या मातीचा भराव पडतो. उतार मिळाला की प्रवाह तयार होतो. उत्साही प्रवाह जिथून वहातो तिथे व्रण तयार करतो. अशा प्रवाहांची दिशा निश्चित करता येत नाही. त्याच्या स्वैर वागण्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतात.

लाव्हा वहातो तिथले आकार, समुद्रकाठचे कंगोरे, नदीच्या कपारी, प्रासंगिक उद्भवलेले ओहळ आपापल्या ऊर्जेचे ठसे अंकित करत असतात. त्यांना आवर घालणारे बांध-कठडे-धरणं-चर-कालवे काढून त्यावर यथाशक्ती नियंत्रण ठेवण्याचा माणूस प्रयत्न करतो.

समाजातील अनिष्ट रूढी रितीचं वळण थोपवण्यासाठी आजवर अनेकांनी स्वतःला समर्पित केलंय. पुढ्यात येऊ शकणारे धोके-धाक-दडपसे जागूनही त्याचं समाजात विधायक कार्य चालू आहे.

सर्व धनतत्त्व आपल्या प्रवृत्ती कुवतीनुसार निमूटपणे अखंड कार्य करत असतं. कुणी शारीरिक बळ वापरतात कुणी सामुहिक, आत्मिक सहारा देतात तर कुणी बौद्धिक निरिक्षणे नोंदवून संबंधितांचं लक्ष वेधून घेतात. माझ्यासारखा सर्वसाधारण कवी मनाचा बुजरा माणूस, खटकलेल्या बाबी शब्द बद्ध करून होणाऱ्या अन्यायाचं कवच फाडून लोकप्रबोधन करू बघतो. स्वच्छ पटलावर पडलेलेओघळांचे नकाशे’  पुसून पाटी स्वच्छ करू बघतो.

विविध सामाजिक छटांचे हे नकाशे आपल्या अवलोकनासाठी.

 

सी. एल. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि