60 125.00
Download Bookhungama App

५१ नुक्कड कथा भाग २ - नुक्कड वरील विविध लेखक

Description:

पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर सादर करीत आहोत ५१ नुक्कड कथांचा दुसरा भाग. बुकहंगामाच्या "नुक्कड " या ब्लॉग वरील ५१ उत्कृष्ट लघुतम कथा (Micro stories).  "बुकहंगामाचा नुक्कड ब्लॉग मराठी कथेला नवीन वळण लावीत आहे. अभिनंदन !!!" सुप्रसिद्ध लेखक ह. मो. मराठेमनोगत २०१४ मध्ये प्रा. माधवी भट ह्यांच्या प्रोत्साहनाने आम्ही लघुकथांचा एक उपक्रम राबवला आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली “सृजन” ह्या आमच्या मासिकाचा “लघुकथा” विशेषांक काढला. पुढे बुकहंगामाचे अत्यंत आधुनिक वेबस्टोअर आम्ही वाचकांसमोर आणले. आमचे एक फेसबुक पेज “न लिहिलेली पत्रे” पत्र संस्कृती पुन्हा एकदा रुजवण्याचे आणि लोकप्रिय करण्याचे कार्य गेले ३ वर्षे करीत आहेच. आज आमच्या ह्या पेजला १६००० च्या वर लाईकस आहेत. अनेक नवे पत्र लेखक पुढे येत आहेत आणि वाचकाना विचारांचे खाद्य पुरवीत आहेत. आमच्या सहकाऱ्यांच्या अनेक बैठकांमध्ये एक मुद्दा वारंवार येत होता आणि तो म्हणजे बुकहंगामाच्या उपलब्ध ब्लॉगचा एक आगळावेगळा वापर आपण करायला हवा जेणे करून नव्या दम्याचे नवे लेखक काही धाडसी उपक्रम राबवतील...नवे लिहू पहातील...नवा प्रयोग करतील. आमचे मार्केटिंग सल्लागार श्री. सोहम सबनीस ह्यांच्या डोक्यात लघुकथांसाठी हा ब्लॉग वापरावा अशी चमकदार कल्पना आली आणि अचानक “नुक्कड” हे नाव सुद्धा माझ्या मनात आले. माझे सर्व सहकारी नव्या कल्पनांनी झपाटून जाणारे आहेत. काही दिवसात माझ्या समोर नुक्कडच्या व्हिज्युअल्सची चित्रे आली. मला ती आवडली नाहीत.  नुक्कडमध्ये एक वेगळी उर्जा जाणवायला हवी असे माझे मत होते. शेवटी आपण सगळे गोष्टी सांगणारे आहोत. नाक्यावर कोणी मित्र भेटला की काल काय घडलं...उद्या काय घडू शकतं...तो काय म्हणाला...ती काय म्हणाली...तो कसा वागला...ह्याच्या गोष्टी सुरू होतात. आणि त्याची संकल्पना मांडणारे व्हिज्युअल हवे असे माझे मत होते. आणि एक दिवस उमेश पेटकरने(आमचा बुवा) आत्ताचे नुक्कडचे व्हिज्युअल समोर  ठेवले आणि माझे त्या व्हिज्युअलशी सूर जुळले. मला एक जाणवले आहे...माझे लेखक माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्यासमोर काही नवे आव्हान ठेवले की ते क्षणार्धात पुढे सरसावतात आणि मला चकित करतात. “विक्रमकाका, हे पहा नवे लिहिले आहे” अशी हाळी येते फेसबुकच्या मेसेज बॉक्स मध्ये. न लिहिलेली पत्रेच्या वेळीस हा अनुभव आला होताच...तोच पुन्हा एकदा “नुक्कड” मध्ये आला. काय विलक्षण ताकदीचे लिहू लागले म्हणून सांगू! सर्वांत कमाल केली लंडनच्या अर्चना हरीश हिने.  तिने लघुतम कथा किंवा अतिलघु कथेचा एक आगळा वेगळा आकृतिबंध सर्वांसमोर ठेवला आणि तो आपल्या लेखकांमध्ये लोकप्रिय सुद्धा झाला. युरोप मध्ये मायक्रो स्टोरीज किंवा ट्विटर स्टोरीज खूप लोकप्रिय आहेत त्यांचा हा आकृतिबंध. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आपल्या ह्या नुक्कड कथांचे अभिवाचन अक्षय वाटवे, ऋतुजा फुलकर आणि प्रियांका शेजाळ ह्यांनी १९ डिसेम्बर केले आणि ते प्रेक्षकांना अत्यंत आवडले. सुप्रसिद्ध कथाकार ह. मो. मराठे आणि डॉ. माधवी वैद्य जातीने प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. शेवटी ह. मो. मराठे सरांनी खूप छान भाषण सुद्धा केले...त्यात त्यांनी काही मुद्द्यांचा आवर्जून उल्लेख केला जे इथे मांडणे मला आवश्यक वाटते. ते असे म्हणाले की, “मराठी कथेचे हे नवे रूप ही काळाची एक गरज आहे...नव्या तरुण वाचकांना आता लांबलचक वाचायला वेळ नसतो...त्यांना थोड्या अवकाशात मोठ्ठा आशय लागतो आणि ती गरज ही नवी कथा पूर्ण करीत आहे.” दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे, “हे नवे लेखक प्रयोग करायला आजीबात कचरत नाहीयेत...घाबरत नाहीयेत.” आणि हे अगदी खरे आहे. अशा निर्भयतेची नुक्कड कथेला खुप गरज आहे...ती ह्या कथेचा प्राणवायू आहे. मला बरेच वाचक विचारतात...नुक्कड कथा म्हणजे काय? माझे उत्तर अगदी सोप्पे आहे...ज्या कथेला कुठलेही व्याकरण नाही ती नुक्कड कथा. नुक्कड कथेने मागे वळून पाहायचेच नाहीये. तिने पुढे पहायचे आहे...नवी  वाट निर्माण करायची आहे. प्रत्येक नुक्कड कथा ही इतर नुक्कड कथांपेक्षा वेगळी असावी, असली पाहिजे...आणि बऱ्याचदा असते. आम्ही ही नुक्कड कथा घेऊन गावोगावी जाणार आहोत हे निश्चित. शेवटी एकच सांगून मी माझे मनोगत संपवतो..... मला लेखक घडवायचे नाहीत...मला गोष्टी सांगणारे घडवायचे आहेत. विक्रम भागवत


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि