60.00 116.00
Download Bookhungama App

नियतीच्या वाटा - अभिमन्यू सूर्यवंशी

Description:

या चौदा कथांमध्ये हळुवार प्रेमकहानीपासून विवाहबाह्य संबंधातून आयुष्य कसंउद्ध्वस्तहोतं हे आपल्याला वाचायला मिळेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत वाट काढणारी माणसं आपल्याला भेटतील. यात ग्रामीण आणि शहरी वातावरणात जगणारी माणसं बघायला मिळतील. भारनियमनासारख्या आपत्तीतून वाट काढीत शेतकरी आणि त्यांची कुटुंबीय कसं जगतात याचंवास्तवचित्रण तुम्हाला वाचायला मिळेल.नियतीच्या वाटाहा अभिमन्यू सूर्यवंशी यांचा दुसरा कथासंग्रह. यापूर्वी त्यांचाअपराजिताकथासंग्रह प्रकाशित झाला. मराठी साहित्यात या निमित्ताने एक मोलाची भर पडली, त्यांचेसांजवणीहे आत्मकथन प्रकाशित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मराठी साहित्य वर्तुळात सूर्यवंशी साहित्यिक म्हणून परिचित झाले. वास्तविक पोलीस खात्यात साहाय्यक आयुक्त म्हणून निवृत्त झालेले सूर्यवंशी निवृत्तीचा काळ वेगळ्या क्षेत्रात घालवतील असे त्यांच्या खात्यातील जवळच्या मित्रांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु निवृत्तीची सुरुवातच मुळात त्यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःला झोकून केली आणि जवळच्या स्नेह्यांना सुखद धक्का दिला. खरे तर पोलीस खात्यात काम करणारी व्यक्ती ही सतत गुन्हेगारांच्या शोधात फिरणारी, कायद्याचा बडगा दाखविणारी, माणसांच्या पासून फटकून वागणारी, करारी, फटकळ असते, असा सर्वसामान्य माणसांचा समज असतो. सूर्यवंशी यांनी मात्र या सर्व समज-गैरसमजांना दूर सारून माणसातला गुन्हेगार शोधण्याबरोबरच एकूणच मानवी व्यवहाराचे मनोज्ञ दर्शन आपल्या लेखणीतून वाचकांना घडवले आणि ललित साहित्यामध्ये आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेले आहे.

मानवी मनाचे, विविध पदर उलगडत माणसांच्या जगण्यातील विसंगती नेमकेपणाने वाचकांसमोर मांडण्याचे कसब सूर्यवंशी यांनी आत्मसात केलेले आहे. त्यामागे अर्थातच पोलीस खात्यातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव असला तरी मुळात त्यांचा स्वभाव हा माणसांच्या अंतरंगात खोलवर डोकावणारा, मानवी मनाचा तळ शोधणारा आणि माणसांच्या जगण्यातील गुंतागुंत उलगडून दाखवणारा आहे. त्यांचाअपराजिता’, आणिसांजवणीवाचल्यानंतर हे वाचकाला प्रकर्षाने जाणविल्याशिवाय राहणार नाही.

नियतीहा निसर्गाचा मानवी जीवनाशी संबंधित असा अनाकलनीय व्यवहार असावा, मात्र माणूस नियतीचा संबंध निसर्ग व्यवहाराशी न जोडता नशिबाशी जोडताना आढळतो. त्यामुळे जगण्याचा सारा भरोसानशिबावर हवाला ठेवून वाटचाल करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दिसते. एकवेळ निसर्गाचे गूढ उकलणे शास्त्रज्ञांना सहज शक्य होऊ शकते. मात्रनशीबया संकल्पनेचे गूढ उकलणे ही अवघड गोष्ट आहे. जगण्यातील अनपेक्षित घडणाऱ्या घटनांचा संबंध नेहमीच नशीब या कल्पनेशी जोडला जातो. वास्तविक नशीब ही माणसाने स्वतःच्या समाधानासाठी, किंवा स्वतःची समजूत काढण्यासाठी निर्माण केलेले एक साधन आहे. ज्या गोष्टीचा ठावठिकाणा लागत नाही किंवा घडलेला घटनासंदर्भ सहज कळत नाहीत, अशा वेळी मनाची समजूत काढण्यासाठी नशिबावर हवाला ठेवून माणसं जगत असतात. नशीब ही माणसाला तात्पुरते समाधान देणारी गोष्ट असली तरी ती माणसाला निष्क्रिय करणारी व जगण्यातील पळवाट शोधणारी गोष्ट आहे. त्यामुळे नशिबावर हवाला ठेवून जगण्यापेक्षा नियतीचा निसर्गाशी संबंध जोडून जगणे यातच जगण्याची सार्थकता किंवा यशस्वीतता आहे. हेच कदाचित सूर्यवंशी यांनानियतीच्या वाटाया कथासंग्रहातून वाचकांना सांगावयाचे असावे, असे वाटते.

नियतीच्या वाटाया कथासंग्रहात एकूण चौदा कथा आहेत. मानवी मनाचा वेध वेगवेगळ्या पातळीवरून घेता घेता जगण्यातील संघर्ष, मानवी मनाचा कोंडमारा, जीवनातील मुक्तता, नाजूक नातेसंबंधातील ताणतणाव, मानवी मनातील सेवाभावी वृत्ती, अतिशय मेहनतीने अतिउच्च शिखर गाठण्याची धडपड, जिद्द, विवाहसंबंधातील ताणतणाव, जीवनातील अनपेक्षित घटना, आणि स्वतःच स्वतःच्या आयुष्याची अखेर करताना निर्माण होणारी शोकांतिका, अशा अनेकविध जगण्याच्या प्रवासाचा वेध या कथासंग्रहातील कथांमधून घेण्याचा प्रयत्न सूर्यवंशी यांनी अतिशय संयमाने केलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या कथांमधून केलेली माणसांच्या जगण्याची उकल ही कुठेही भाबडेपणा वाटत नाही, तशी अतिरेकी किंवा आक्रस्ताळी असल्याचे वाचकांना जाणवणार नाही. या संग्रहातील सर्वच कथांचे विषय हे इथल्या मातीतील आहेत. रोजच्या जगण्यातले आहेत, त्यामुळे ते आपले वाटतात. कथेतील विषयाची मांडणी, प्रसंगाची निवड आणि कथेचा शेवट मनाला अस्वस्थ करणारा आहे. विशेषतःवेदनेच्या कळाया कथेची नायिका आशालता ही आपल्या नवऱ्याच्या अनैतिक वागण्याला पाठिंबा न देता तिच्या स्वतःच्या हिमतीवर, एम..एम.एड. होऊन प्राध्यापिका होते. स्वतःची शिक्षण संस्था काढते. आदिवासी भागात शैक्षणिक कार्यात स्वतःला गुंतवून घेते. एवढे सगळे काम करत असतानाच कन्या एम.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन डेप्युटी कलेक्टर बनते. - त्याच वेळी तिचा पती शेखर लाचलुचपतीच्या प्रकरणात पकडला जातो, एकीकडे नायिकेची जगण्याची जिद्द आणि दुसरीकडे पतीचे अधःपतन याचे अतिशय परस्पर विरोधी अंतर्मुख करणारे शब्दचित्र सूर्यवंशी यांनी या कथेत रेखाटलेले आहे. ते मुळातूनच वाचायला हवे.

सूर्यवंशी यांनीनियतीच्या वाटाया कथासंग्रहात कौटुंबिक वातावरणातील कथा चितारलेल्या आहेत. तशा सभोवतालच्या वातावरणात घडणारे वास्तव व मानवी जगणेही तितक्याच आत्मियतेने रेखाटलेली आहेत. त्यांचीवास्तवही कथा कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयीचे वास्तव आपल्यापुढे ठेवते. ग्रामीण भागातील शेतकरी व त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आणि त्यातून उद्भवणारे भयानक व अंतर्मुख वाटणारे आजचे वास्तव वाचकापुढे ठेवण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याच्या शोकांतिकेबरोबरच गावगाड्यातल्या दलित सवर्ण यांच्यातील ताणतणाव व त्यातून दलितांवर होणारे अत्याचार या घटना राजकारणी मंडळी कशाप्रकारे पैशाचा व सत्तेचा गैरवापर करून घडवतात - याचेही शब्दचित्रश्रद्धांजलीया कथेतून सूर्यवंशी रेखाटतात. तसेच गावसुधारणेचे वास्तवही आपल्यापुढे मांडतात. एखादी विधवा स्त्रीसुद्धा गावगाड्यात जिद्दीने उभी राहू शकते, आणि गावाचा कायापालट करू शकते, हे चित्रपुरस्कारनावाच्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामविकासाचे काम करणारी विधवा प्रस्थापितांच्या विरोधाला न जुमानता गावात वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा करून गावालागाडगेबाबा स्वच्छता अभियाननिर्मलग्रामअसे पुरस्कार मिळवून देऊन एक आदर्श घालून देते.

नियतीच्या वाटाया कथासंग्रहातील कथा ह्या एकसुरी वाटत नाहीत, मानवी जगण्यातील चढउतार, संघर्ष, त्यात प्रकर्षाने जाणवतो. जगण्यातील विकृती, विसंगती, अनाचार, अनैतिकता, गुन्हेगारी या प्रवृत्तीशिवाय जिद्द हाही कथेतील नायिकेचा विशेष - ठळकपणाने दिसतो, केवळ जगणे हे निराशजनक आहे किंवा निरर्थक आहे. असे न दाखवता, मनात असेल तर, मनुष्य आपल्या आयुष्याला उत्तम आकार देऊ शकतो हे सूत्र काही कथांमधून मांडण्यात सूर्यवंशी यशस्वी झालेले आहेत. ज्यांची आयुष्य उतरणीला लागलेली आहेत किंवा ढासळण्याच्या मार्गावर आहेत अशा जगण्याला आधार निर्माण करून ती आयुष्य पुनः उभी करण्याचा संदेशही नकळत लेखक कथेतून देतो. तो आशावाद वाचकांना निश्चितच उभारी देणारा आहे.

या संग्रहातील कथेच्या केंद्रस्थानी असणारा विचार हा निश्चितच अपेक्षा वाढविणारा आहे. सुखदुःखाच्या लाटेवर स्वार झालेले कधी सावरण्यात यशस्वी होतात तर कधी स्वतःच्या दुर्गुणामुळे किंवा चुकीच्या निर्णयामुळे लाटेबरोबरच वाहात जातात बाहेरख्याली स्वभावाचे पुरुष, व्यसनी वृत्तीची माणसे ही नेहमीच विनाशाच्या वाटेवरची वाटसरू ठरतात. त्याच्या जीवनाची अखेर, ही नेहमीच त्याच्या जीवनाची शोकांतिका ठरते. सूर्यवंशी अशा घडणाऱ्या अनपेक्षित शोकांतिकेलाचनियतीसमजून ज्याचे त्याचे माप ज्याच्या त्याच्या पदरात टाकतात. या संग्रहातीलआयडॉलची शोकांतिका’, ‘नियतीच्या वाटा’ , ‘उद्ध्वस्त’, ‘मुक्त’, ‘निरोप’, ‘वेदनेच्या कळाइत्यादी कथांमधून हे प्रकर्षाने जाणवते.

या कथासंग्रहातील कथांचे वेगळे वैशिष्ट असे आहे, की मुळात सूर्यवंशी यांचे कथालेखन हे आपल्याभोवती घडणाऱ्या प्रसंगातून फुलत जाते. साधी सरळ प्रसंगाची मांडणी आणि सोप्या शब्दात गुंफलेले कथानक वाचकाला परिचित आहे असे वाटते. त्यामुळे ते वाचनीय तर झाले आहेच; शिवाय विचार करायला लावणारेही आहे.

सूर्यवंशी यांचे मुळात जगण्यावर विलक्षण प्रेम आहे. त्यामुळे जगण्यातील वैविध्यपूर्ण पदर ते अलगद, हळुवारपणे उघडून दाखवू शकतात. त्यांच्या निवेदनात मत्सर, तिरस्कार, संताप आढळत नाही. प्रसंग आत्महत्येचा असो, राजकारण्यांकडून होणाऱ्या छळवणुकीचा असो किंवा जोडीदाराच्या अनैतिकतेचा असो. त्या प्रसंगाला हाताळण्याचे कसब सूर्यवंशी यांच्या लेखणीत आहे. वाचकाला ते आपल्या बरोबर घेऊन जातात, प्रसंगाचा कोपरान् कोपरा अतिशय तटस्थपणे दाखवतात. कथेतील पात्रांच्या स्वभावांची ओळखही तपशिलाने करून देतात. आणि कथेत घडणारा एकेक प्रसंग अतिशय सावधपणे मांडून वाचकाला अखेरच्या टप्प्यावर आणून सोडतात. हे सूर्यवंशी यांच्या कथालेखनाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

 

प्रा. रामनाथ चव्हाण


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि