60 116
Download Bookhungama App

निवडक बिरबल - राजा मंगळवेढेकर

Description:

आबालवृद्धांच्या लाडक्या बिरबलच्या चातुर्यकथाप्रस्तावना प्रिय बालमित्रांनो, ‘तुमच्यासारख्या खेळकर (आणि खोडकरसुद्धा हं!) मुलांना गोष्टी सांगत फिरणं’ हे माझं आवडीचं काम. संधी मिळेल तेव्हा मी गोष्टी सांगण्यासाठी या मराठी मुलुखात ठिकठिकाणी जातो. तुमच्याशी गप्पागोष्टी करताना माझ्या हे लक्षात आलं, की तुम्हा बालगोपाळांना बिरबल फार फार आवडतो. मलासुद्धा आवडतो, त्याची नि माझी गट्टीच जमली आहे. त्यानं आपल्या चातुर्याच्या, शहाणपणाच्या कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत. आता, ‘केव्हा? कुठं? कशा?’ - असले प्रश्न मात्र विचारू नका बुवा! - पण जर आग्रहच किंवा हट्टच असेल तर कान इकडं करा, सांगतो – ‘स्वप्नात!’ खरंच आहे. नाहीतर सुमारे चार-साडेचारशे वर्षांपूर्वी येऊन गेलेला बिरबल मला कसा भेटणार? तर त्यानं आपल्या म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या, त्याच मी आठवणीतून माझ्या भाषेत निवडून - पाखडून सांगत आहे, म्हणूनच या पुस्तकाचं नाव ठेवलंय - ‘निवडक बिरबल!’ - राजा मंगळवेढेकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि