Id SKU Name Cover Mp3
Nath Palkhi


20.00 36.00
Download Bookhungama App

नाथ पालखी - सी. एल. कुलकर्णी

Description:

खरं तर आपलं संपूर्ण जीवन, असाच प्रवाह असतो. मागे वळून अवलोकन केलं तर ती एक अशा साक्षात्काराची अखंड मालिकाच असते, अनावधानाने दुर्लक्षित केली गेलेली. एखादीच घटना जेव्हा प्रकृतीच्या ह्या प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करते तेव्हा ती अविस्मरणीय उदाहरण ठरते.मनोगत

मनुष्य जन्माला आल्यापासून अखेरपर्यंत येणारे अडथळे पार करत सहज वळणाने वाहत असतो एखाद्या नदीसारखा. अनेकदा त्याने ठरवलेल्या साध्या सरळ सोप्या मार्गावरून, इच्छा प्रबळ असूनही जाता येत नाही. तसंच एखादा अवघड घाट कसा पार झाला हेही त्याला कळत नाही. तत्कालीन इच्छा आणि नियंत्यांच्या नियोजित योजना ह्या एकाच दिशेने काम करत असतील तर मिळणारं यश हेत्याच्या’  प्रयत्नांना मिळालेलं फळ आहे, असं कुणीही सहज मानतो. त्याच जर एकमेकींच्या विरुद्ध दिशेने काम करत असतील तरइच्छेला अपयश आलेलं असतं,’ पण कार्य थांबलेलं नसतं, त्यानं आपल्या कल्पनेपलीकडचं वळण घेऊन साध्य सिद्ध केलेलं असतं. असं साध्य नियंत्याच्या असीम अधिपत्याची साक्ष देऊन जातं, ज्याला आपणसाक्षात्कारम्हणतो. ह्या गोष्टीचा अजाणतेने विचार केला तर त्यालाचमत्कारहीम्हणता येईल.

खरं तर आपलं संपूर्ण जीवन, असाच प्रवाह असतो. मागे वळून अवलोकन केलं तर ती एक अशा साक्षात्काराची अखंड मालिकाच असते, अनावधानाने दुर्लक्षित केली गेलेली. एखादीच घटना जेव्हा प्रकृतीच्या ह्या प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करते तेव्हा ती अविस्मरणीय उदाहरण ठरते.

माझी अभियांत्रिकी पार्श्वभूमी आणि कलासंस्कृतीचं मिळालेलं वाण ह्यांच्या संयोगातून घडलेली, इंदौरच्या प. पू. माधवनाथ महाराजांचीपालखीहा असाच एक अपूर्व योग. माझं अस्तित्त्व हा संदर्भ, मी एक निमित्त, निर्मिती प्रक्रिया एक सूक्त आणि महाराज त्या निर्मितीचा सम्राट, अनभिषिक्त!! प्रेरणेपासून प्रस्थापनेपर्यंतच्या पालखीच्या प्रवासाची ही नोंद, म्हणजे एका ध्यासपर्वाला मिळालेलं चिरंजीव कोंदण, कृतज्ञतेचं हृद्य समर्पण आहे. ह्या निमित्ताने वाचकालाकर्मयोगापाठचीनियंत्याची योजना कळावी.

 

- सी. एल. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि