60 116
Download Bookhungama App

नाम नवनीत भाग 2 - ह.भ.प. डॉ. पांडुरंग रामपूरकर

Description:

‘नाम नवनीत’ या चिंतनात्मक लिखाणातून ह.भ.प. डॉ. पांडुरंग रामपूरकर यांनी नाम साधनेचे महत्व सांगितले आहे. Dr. Pandurang Rampurkar has articulated importance of ‘Naam Sadhana’/Chanting in his lucid writing ‘Naam Navaneet’प्रस्तावना  मानवी कल्याणाचा हेतू असलेल्या भारतीय संस्कृतीच्या साहित्यसृष्टीरूप नंदनवनात मराठी संतांचे वाङ्‌मय हा एक कल्पतरू आहे. या कल्पतरू खाली अनेक शतके पुष्कळांना विश्रांती मिळाली आहे. या संत वाङ्मयात अग्रगणी असलेल्या संतसम्राट ज्ञानेश्वर माऊलींचे ग्रंथसाहित्य सूत्रवत्‌ असले तरी त्यातील हरिपाठ ग्रंथ सांगताना भोळ्याभाळ्या मराठी माणसांसाठी श्रीमाऊलींची मूर्तिमंत करूणाच शब्दकळेत अवतरलेली दिसते. हरिपाठ शब्दामध्ये मध्यम पदलोपी समास आहे. पुरणपोळीतील कणीक दोन्हीकडून स्पष्ट दिसते व आतील पुरण ज्याप्रमाणे गुप्त असते, त्याप्रमाणे हरी व पाठ या दोन शब्दातील नाम शब्दाचा लोप आहे. हरी, नाम, पाठ हे तीनही शब्द निरनिराळ्या क्रमाने हरिपाठात येतात. हरिपाठात सर्वांकरिता व सर्वकाळ ‘हरी मुखें म्हणा’ ही एकच गोष्ट नानापरीने सांगितली आहे, एवढे नीट समजले की काम झाले. अडचण अशी आहे की, साधन सोपे असते पण त्याचे महत्त्व कळल्यावाचून ते केले जात नाही. या साधनाचे श्रीमाऊलींनीच सांगितलेले महत्त्व विशद करून सांगण्याची व्यवस्था आवश्यक ठरते; व हे अपूर्व कार्य श्री. ह.भ.प. (डॉ.) पांडुरंग रामपूरकर यांनी लिहून पूर्ण केले आहे. त्यांच्या सरळ व मोकळ्या स्वभावाप्रमाणेच त्यांची लिखाणशैली वाटते. शास्त्रीय सिद्धांताचा धागा न सोडता, व्याकरणाच्या नियमांची गडबड न करता माऊलींच्या शब्दाशब्दाचा मागोवा घेत, हसत खेळत व सोप्या सुलभ दृष्टांताचा आधार घेत माऊलींच्या शब्दातील रहस्यमय मनोगत सामान्य श्रोत्याच्या अंतर्मनापर्यंत पोचविण्याचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होवो व त्यांचे हे ग्रथित अधिकाधिक लोकसमूहापर्यंत जाऊन सर्वांच्या अन्त:करणात हरिपाठसाधनेची प्रेरणा प्राप्त होऊन त्यांची साधना, ‘किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होवोनि तिही लोकी। भजिजो आदिपुरुखी। अखंडित।।’ या माऊलींच्या संकल्पनेप्रत जावो ही ईश्चरणी प्रार्थना. - प्रज्ञाचक्षु ह. भ. प. मुकुंदकाका जाटदेवळेकर


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि