60 144
Download Bookhungama App

मुंबईला चक्कर - भा.रा.भागवत

Description:

कीप असाइड पृथ्वीप्रदक्षिणा- बिपिन बुकलवार, तू मुंबई शहराला प्रदक्षिणा घालायला तयार आहेस का- ८० मिनिटांत? मी बीट लावायला तयार आहे. जिंकलास तर तुला दोन हजार रुपये देईन! इथून झाली मुंबईला चक्कर मारायची सुरुवात.विलक्षण पैज! बिपिनने पुस्तकातून बाहेर उडी मारली ती पहिल्याने चार-साडेचार वर्षांपूर्वी- अचानक! दिवस मला नक्की आठवत नाही, पण गांधी जयंती साजरी होऊन काही दिवस झाले होते एवढं आठवतं. आपल्या खोलीत बिपिन बुकलवार कॉटवरच्या उशांना टेकून पहुडलेला होता. स्टुलावर रिकामी झालेली किटली नि कपबशी पडली होती. त्यावरून स्वारीने नुकताच सकाळचा चहा संपवलेला होता. हातात वर्तमानपत्र होते. ते त्याने एकाएकी बाजूला फेकले. भिंतीवरच्या कॅलेंडरकडे त्याची दृष्टी वळली. कितीतरी वेळ तो तिकडे डोळे वटारून बघत होता. मग तो खाली वाकला. कॉटखालच्या बॅगेतून त्याने चित्रकथांनी भरलेली कॉमिक पुस्तके काढली- ढीगभर. त्यांतले एक कॉमिक बाजूला काढून बाकीची त्याने परत बॅगेत टाकली आणि ते निवडलेले कॉमिक पुढे धरून तो पुन्हा कॉटवर आरामात बसला आणि ते चाळू लागला. आजपर्यंत किती तरी वेळा त्याने ती चटकदार गोष्ट वाचली असेल पण आज पुन्हा तो नव्याने तीत रंगला होता, ताजेपणाचाच आनंद लुटीत होता. इतक्यात शेजारचा विजू शिट्ट्या फुंकीत तिथे प्रविष्ट झाला. बिपिनची समाधी लागली आहे हे पाहिल्यावर त्याने शिट्ट्या फुंकणे बंद केले. दुसऱ्याच क्षणी बिपिनच्या खांद्यावरून त्यानेही पुस्तकात डोके घातले. ‘काय वाचतोस रे बिपिनबाबू? - आयला! माझी एकदम टॉप आवडती स्टोरी! - मराठीतून परवाच वाचली मी ही कादंबरी - झपाटलेला प्रवासी!’ ‘आणि या इंग्रजी कॉमिकवरून मी चार वेळा तरी तुला सांगितली असेल ती- अराऊंड दि वर्ल्ड इन एटी डेज!’ बिपिनने त्याच्याकडे न पाहता त्याला सुनावले. ऐंशी दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा!


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि