300 600
Download Bookhungama App

मोहनगरी (दिलीप-राज-देव विशेषांक) - संपादक : आनंद लाटकर

Description:

मोहनगरीचा हा पहिलावहिला दिवाळी अंक. १९५० ते १९७० च्या सुवर्णकाळातील हिंदी सिनेमाला वाहिलेला.संपादकीय मोहनगरीचा हा पहिलावहिला दिवाळी अंक. १९५० ते १९७० च्या सुवर्णकाळातील हिंदी सिनेमाला वाहिलेला. त्या सुवर्णकाळाची आठवण जागवणारा दिवाळी अंक काढावा असं मनात फार दिवस होतं. तसेच प्रत्येक वर्षाचा दिवाळी अंक हा विशेषांक असावा असंही वाटत होतं. त्यामुळे अर्थातच पहिला अंक आम्ही त्या सुवर्णयुगातील सुपरस्टार्सवर काढायचे ठरवले. दिलीप-राज-देव हे ते तीन निर्विवाद सुपरस्टार्स- हे तीन महामानव -एकाच सुमारास जन्मले आणि एकाच सुमारास पडद्यावर आले- ‘ते आले- त्यांनी पाहिले-त्यांनी जिंकले’ आणि भारतातल्या तमाम चित्रपट रसिकांची त्यांनी आपापल्या फॅन्समध्ये फाळणी करून टाकली. स्वातंत्र्यापूर्वीची एक-दोन वर्षे ते स्वतंत्र भारताची पहिली २०-२५ वर्षे ही त्रिमूर्ती खऱ्या अर्थाने रसिकांच्या हृदयात विराजमान झाली. त्यांनी प्रेक्षकांना तारुण्य जगायला शिकवलं. नायकप्रधान चित्रपटांना या तिघांनीच जन्म दिला आणि आपापल्या वैभवशाली कारकिर्दीत तो शेवटपर्यंत टिकवला... अशा या त्रिमूर्तींवर विशेषांक काढणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. पण बरोबरच्या सर्व लेखक मित्रांनी मोलाची साथ दिली आणि या दर्जेदार अंकाची निर्मिती होऊ शकली. लार्जर दॅन लाईफ असलेल्या या ट्रायोला २००-२२५ पानांत बसवणे हे अत्यंत अशक्यप्राय आव्हान आम्ही पेलायचा प्रयत्न केला आहे. या तिघांचे चित्रपट- संगीत-गाणी-लोकप्रियता-त्यांच्या अभिनयाच्या विविध छटा तसेच कक्षा आणि मर्यादासुद्धा लेखकांनी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यांच्या अभिनयाचे आणि अभिनयाच्या पद्धतीचे विश्लेषणदेखील आपणास निश्चित आवडेल. दिवाळी अंक हे खऱ्या अर्थाने एक मोठे टीमवर्क आहे. लेखक हा तर त्याचा केंद्रबिंदूच आहे. त्याबाबतीत आम्ही सुदैवी ठरलो. डी. टी. पी., ले-आऊट, प्रूफरीडिंग, प्लेट-मेकिंग, बाईंडिंग अशा निर्मितीच्या सर्व स्तरांतूनच हा अंक पूर्णत्वाकडे जात असतो. सदर सर्व व्यवस्था आमच्या स्वतःच्या मुद्रणालयातच झाल्या असल्या तरी त्या सेवा आम्हाला तत्परतेने देणाऱ्या सर्व स्टाफचा व कामगार वर्गाचा या अंकात मोलाचा वाटा आहे हे नमूद केलेच पाहिजे. आपण ह्या अंकास दिलीप-राज-देवच्या चित्रपटांसारखाच भरघोस प्रतिसाद द्याल ही खात्री आहे. आनंद लाटकर संपादक


Format: Adaptive

Publisher: लाटकर प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)