60 136
Download Bookhungama App

मीनाकुमारीच्या शोधात - डॉ.सुनील अणावकर

Description:

अमेरिकेत वास्तव्य असलेले डॉ सुनील अणावकर आपल्या कन्सल्टन्सी व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून लेखन करतात. त्यांच्या कथा विविध मासिके / पत्रिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या "मीनाकुमारीच्या शोधात"या कथासंग्रहातील कथा अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांच्या मनोव्यथा उलगडून दाखवितात. या कथासंग्रहा सोबतच त्यांचे दोन अंकी नाटक "गीत ये न ते जुळून" आपणासाठी सादर करिताना सृजन परिवारास खूप आनंद होत आहे. आपण या दोन्ही पुस्तकांचे स्वागत कराल हि खात्री आहेच.मीनाकुमारीच्या शोधात त्या चित्रपटामुळेच दिलीपकुमार पासून अमिताभ बच्चन पर्यंतचे नट व नर्गीस पासून रेखा पर्यंतच्या नट्या डॅनीच्या परिचयाच्या झाल्या होत्या. नट-नट्यांमध्ये डॅनीच्या कोवळ्या मनावर अर्थात जबरदस्त परिणाम करून गेली ती म्हणजे मीनाकुमारी. त्याच्या डॅडींनी मीनाकुमारीचे ‘परिणिता’ पासून ‘पाकीझा’ पर्यंतचे सर्व चित्रपट आणले होते. ते पाहताना डॅनीला काहीतरी वेगळाच आनंद वाटायचा. तिचे सौंदर्य व मादक हावभाव त्याच्या कोवळ्या मनाला विलक्षण गुदगुल्या करून जात. परंतु मुख्य म्हणजे, तिने सादर केलेल्या पतिव्रता त्याच्या मनात कायमचे घर करून गेल्या. एवढी सहनशील बाई या जगात असू शकते याचे त्याला खूप आश्चर्य वाटायचे. अमेरिकेतील जेन फोंडा सारख्या बंडखोर नायकेच्या तुलनेत मीनाकुमारी त्याच्या बालमनाला देवतेसारखी वाटायची. त्याने एकदा आपल्या मॉमीला त्या फरकाबद्दल विचारले व अशा बायका अमेरिकेतही असतात का असाही प्रश्न केला. त्यावर ती म्हणाली, “बाळा, तोच अमेरिकन व भारतीय बायकांमधला फरक आहे. इथे अमेरिकेत तुला मीनाकुमारीसारख्या बायका भेटणार नाहीत. यू हॅव टू गो टू इंडिया टू फाईंड मीनाकुमारी. बेटा, तुला मीनाकुमारी पहायची असेल तर भारतात जायला पाहिजे.” डॅनीला त्यावेळी आईच्या बोलण्याचा अर्थ तितकासा चांगला कळला नव्हता. दहा-बारा वर्षाच्या मुलांना तेवढी जाण नसते. एवढे मात्र त्याच्या बालमनाने ठरविले की, “मोठा झाल्यावर मी मीनाकुमारीशीच लग्न करणार.”


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि