Id SKU Name Cover Mp3
माझ्या पिल्लांच्या बाबास


80 174
Download Bookhungama App

माझ्या पिल्लांच्या बाबास - दीपा मिट्टीमनी

Description:

दीपा फक्त अनिवासी भारतीय आहे हे एकाच आव्हान तिच्या पुढे नाही...तर ती आणि तिचे पती पालकत्वाची जबाबदारी सुद्धा निभावत आहेत आणि त्यातही अनिवासी भारतीय पालक. इथे दोन संस्कृतींमधील तुलना अनिवार्य असते. सामाजिक स्तर भिन्न असतात ...नैतिकतेच्या संकल्पना घरातल्या आणि घराबाह्र्च्या भिन्न असू शकतात आणि मुलांना वाढवताना हे सर्व एक वेगळेच आव्हान पालकांपुढे उभे करते. हे आव्हान निभावून नेताना आई आणि बाबा ह्यांच्यात खूप सशक्त संवाद असणे अत्यंत महत्वाचे असते. हा पत्र संग्रह ह्या संवादाचे द्योतक आहे. Publishing Next Conference 2015 च्या "बेस्ट इ-बुक ऑफ द इयर" साठी नामांकन मिळालेले पुस्तक  Nominated for "Best e-Book" Of The Year Award in Publishing Next Conference 2015. Letter stories on challenges in parenting especially of NRI.माझ्या पिल्लांच्या बाबास - Publishing Next Conference 2015 च्या "बेस्ट इ-बुक ऑफ द इयर" साठी नामांकन प्रकाशकाचे मनोगत दीपा मिट्टीमनी ह्यांची पत्रे “न लिहिलेली पत्रे” ह्या फेसबुक पेज वर प्रथम पोस्ट झाली आणि अल्पावधीत ती खूप लोकप्रिय झाली. ह्या पत्रांमधील  अवधान आणि त्यातील समस्या ..त्यातील विधान ..हे एका अनिवासी भारतीय महिलेचे आहे. बरे दीपा फक्त अनिवासी भारतीय आहे हे एकाच आव्हान तिच्या पुढे नाही...तर ती आणि तिचे पती पालकत्वाची जबाबदारी सुद्धा निभावत आहेत आणि त्यातही अनिवासी भारतीय पालक. इथे दोन संस्कृतींमधील तुलना अनिवार्य असते. सामाजिक स्तर भिन्न असतात ...नैतिकतेच्या संकल्पना घरातल्या आणि घराबाह्र्च्या भिन्न असू शकतात आणि मुलांना वाढवताना हे सर्व एक वेगळेच आव्हान पालकांपुढे उभे करते. हे आव्हान निभावून नेताना आई आणि बाबा ह्यांच्यात खूप सशक्त संवाद असणे अत्यंत महत्वाचे असते. हा पत्र संग्रह ह्या संवादाचे द्योतक आहे. मुख्य म्हणजे ह्यात वैचारिक प्रवास आहे. काय होते...आपण मुले  वाढवत असताना आपण पालक म्हणून सुद्धा  वाढत असतोच न? समस्या तर येत असतातच...कधी माती गुंग होते...मुले निरुत्तर करणारे प्रश्न विचारतात...आणि मग पालकांना सुद्धा एकमेकांना ह्या नवीन नात्याच्या संदर्भात एकमेकांना पुन्हा एकदा समजून घेण्याची गरज उत्पन्न होते. ह्या पत्रांमध्ये दीपा ने दैनदिन जीवनात घडणाऱ्या घटना वानगी दाखल घेतल्या आहेत आणि मग त्यावर साधक बाधक विचार मांडले आहेत. तिने काही समस्या सोडवण्याचे मार्ग सुचवले आहेत..ज्या मध्ये संवाद खूप महत्वाचे स्थान धारण करतो आहे. आजच्या जगण्यात आपण सतत  आपल्या वागणुकीबद्दल, वर्तना बद्दल....पुनर्विचार करणे आवश्यक आहे. पूर्वग्रह दुषित मते एकमेकांमध्ये अंतर...दुरी निर्माण करू शकतात. आज केवळ मुलांना पालकांबरोबर जास्तीत जास्त जागा हवी आहेच...पण पालकाना सुद्धा एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणे आवश्यक झाले आहे. मला  वाटते...हे पुस्तक हा एक अनुभव आहे....जो तुम्ही जरूर घ्यायला हवा. यशस्वी पालक बनण्याच्या प्रक्रियेत ते तुम्हाला  निश्चित एक पाउल पुढे टाकायला मदत करेल.   सृजन


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि