60 116
Download Bookhungama App

माझिया सासूला - नेहा कुलकर्णी

Description:

सासू सुनेच्या नात्यातील कुरबुर तक्रारी आणि गमतीजमती मांडणाऱ्या हलक्या फुलक्या कथांचा हा संग्रह आहे. These are the stories about relationship of mother-in-law and daughter-in-law.लेखकाचे मनोगत  सासू सुनेच्या नात्यातील जुगलबंदी सर्वश्रुत आहे. गंमत म्हणजे प्रत्येक पिढीतील सासूला या पिढीतील सुना भाग्यवान वाटत असतात. आपल्या सासुपेक्षा आपण फारच समंजस आहोत असा त्यांचा समाज असतो. आपली सासू आपल्याला फार छळायाची त्यापेक्षा आपण आपल्या सुनेला फारच सांभाळून घेतो. उलट सुनांना वाटतं की यांनी यांच्या सासूला कसं धारेवर धरलं होतं तसं आम्ही नाही करत तरीही सतत कुरबुरी करायला बरं जमतं यांना. दोघींच्याही बाजू अनादी काळापासून आपापल्या जागी बरोबर आहेत. आणि जगाच्या अंता पर्यंत त्या तशाच राहणार आहेत. मग आपण काय करायचं..? माझ्या कडे बघू नका असं अपेक्षेने.. या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही, मुळात ब्रह्मदेवाकडेही नाही. सध्या जरा या नात्यातल्या कुरबुरीची मजा घेऊ. कसं असतं नं, अत्यंत छळणारी ललिता पवार छाप सासू किंवा अगदीच एखादी आतल्या गाठीची कावेबाज सासू दहात एक असेल.. फारफारतर एखादी. बाकी सगळ्याजणी म्हणजे कुरबुरींचे नुसते बुडबुडे! बारीक बारीक खोड्या असतात प्रत्येकाच्या स्वभावाच्या. सासू म्हटलं की हा खोडकर स्वभाव आणखीनच उजळून निघतो. त्या त्या सुनेला सासूच्या स्वभावातल्या या खोड्या त्रासदायक वाटतात मात्र इतरांना ऐकताना वाटतं ही काय तक्रार करण्यासारखी बाब आहे. अशाच तक्रारींचा पाढा म्हणजे यातल्या कथा. - नेहा कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि