60 116
Download Bookhungama App

माउली - रुजरिओ पिंटो

Description:

रुजरिओ पिंटो यांच्या ‘माउली’ या कविता संग्रहातील कविता मालवणी संस्कृती, परंपरा, जीवन संकेत आणि कोकणातील ग्रामीण जीवनाचे यथार्थ चित्रण करतात. Poetry of Rujario Pinto From ‘Maaulee’ portray Malvani Culture, Tradition, Life style and Rural Life of Konkan.प्रस्तावना कोकणातील मालवणच्या भूमीशी इमान राखणाऱ्या, मालवणी संस्कृती, परंपरा, जीवन संकेत तसेच लोक जीवनाचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या या संग्रहातील कविता वाचकांचं लक्ष वेधून घेतात. त्यातील 'माझी माय' ही कविता तर अस्सल मालवणी बोलीत असून त्यात वेगवेगळ्या रूपात तिची वत्सलता प्रगट झाली आहे. पिंटोंच्या अनेक रचनामध्ये त्यांच्या कवितांच्या शेवटच्या एक दोन चरणातील उत्कर्ष आणि अन्य वळणदार बिंदूंनी वाचकांना विस्मयचकित करणारा आनंद देण्याची क्षमता आहे. अशाच प्रकारे पिंटोंच्या काही कवितांमध्ये कलाटणी देणाऱ्या आणि वाचकांना विस्मयचकित करणाऱ्या ओळीही ओघांमध्ये येऊन जातात. उदाहरणार्थ, त्यांची 'सोबत' ही 'एक विशाल वृक्ष असावा' या ओळीपासून सुरू होणारी कविता शेवटी. थकल्या म्हाताऱ्याला तुझी काठी मिळावी सरणावर तुझी सोबत मिळावी. या ओळींनी रसिक वाचकांच्या मनात कालवाकालव करून जाते. आपल्या अंतःकरणात भोवतालच्या एकूण परिस्थितीचं उमटलेलं प्रतिबिंब या कवीनं आपल्या 'हितचिंतक', 'भोंदूबाबा', 'अभागी', 'माणूसपण', ‘यौवनाच्या वाटेवर', 'झुंज' सारख्या काही कवितांमध्ये परिणामकारकतेनं शब्दांकित केलं आहे. त्यातील 'दीपस्तंभ', 'दारुबंदी' सारख्या कवितांमध्ये खेळकरपणे (आणि खोडकरपणे) कवीनं दंभ स्फोट केला आहे. या संग्रहातील उपरोधपूर्ण 'दीपस्तंभ', कारुण्यपूर्ण 'ती', स्वभावोपर 'कळी', आणि कल्पनाविलासरंजित 'स्वप्नघर' या कविता उल्लेखनीय आहेत. काही कवितांतून फीलगुड, पर्फ्युम, डिझेल सबसिडीसारखे वास्तवातले संदर्भही अगदी सहजासहजी येऊन जातात. या संग्रहातील कवितांच्या अनुभूतींना खास स्वतःचा असा चेहरा असल्यामुळे आणि अभिनिवेश न बाळगता नवोदित कवींमध्ये सर्रास मोठ्या प्रमाणावर आढळणारी दुर्बोधता टाळून लिहिलेल्या या कविता असल्यामुळे हा संग्रह रसिकप्रिय होईल अशी मला आशा वाटते. - गंगाधर महाम्बरे


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि