60 140
Download Bookhungama App

माऊ भाग - १ - विक्रम भागवत

Description:

हा एक प्रवास आहे..ते तिचे भेतात....मित्र होतात...आणि माऊमध्ये गुंतत जातात. आता ते तिघे भिन्न ठिकाणी आहेत. भिन्न जातात. पण त्यांना त्या सुंदर आठवणी पुन्हा जगायच्या आहेत. त्याच्यासाठी पत्र हे एकच माध्यम ते निवडतात. एकमेकाना पत्रातून आठवणी जागवत भेटत राहायचे ते ठरवतात. त्यातून एक वैचारिक आणि भवानीक प्रवास सुरु होतो... कुठे घेऊन जातो तो प्रवास त्यांना...?पत्र क्रमांक - १ प्रिय...... तर ही अशी सुरुवात होणार होती. खूप दिवस मनात होतं पण काय झालंय कळत नाही शब्द नुसत्याच हुलकावण्या देतात. तू कुत्सितपणे हसतो आहेस ह्याची मला कल्पना आहे! हे माझे बरेचसे सुरुवात न झालेल्या लिखाणासारखे आहे किंवा असेल असा दुष्ट विचार तुझ्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसतो आहे. आणि तसा संशय घ्यायचा तुला पूर्ण अधिकार आहे कारण असे फळाला न आलेले गर्भारपण तू खूप वेळा पहिले आहेस, सोसले आहेस. पण मुळात मला पूर्णत्वाचा कंटाळा आहे. पूर्णत्वासाठी खूप मोठा आत्मविश्वास हवा पण आत्मविश्वासाबरोबर वाहणारा अहंकार मला झेपत नाही हे सुद्धा तुला माहित आहे. जाऊदे.... मी असा भरकटत जाणार आणि तुझ्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य तरलणार. पण कुठे तरी अभिव्यक्तीत व्हावे असे खूप दिवस वाटत होते. एकांत हा आपली गरज आहे तो आपण आनंदाने स्विकारला आहे आणि तरीही स्वतःच्या स्वातंत्र्यावर गदा न येऊ देता संवाद साधायचा असेल तर पत्र हेच एक माध्यम आहे असे मला जाणवले. आपण एकमेकांना किती पत्रे लिहिली तुला आठवतं? चिडून तू त्यांची होळी पेटवलीस असे शेवटी म्हणाला होतास.... कुठेही न जाणारी वाट असे तू त्या पत्र-संग्रहाचे वर्णन केले होतेस. मूर्ख, प्रत्येक वाट कुठे जायलाच हवी असा नियम आहे का? तिच्यावर ही जबरदस्ती का? काहीही न करणे हे जसे बरेच काही करण्यासारखे असते तसेच... कुठेही न पोचणे किंवा कुठेही न जाणे... हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुक्काम असू शकतो हे तुला कधी कळणार? ही सुरुवात आहे आणि त्यात कुठे पोचण्याचा इरादा नाही. मी एखाद्या व्हॅगाबाँड सारखा निघालो आहे, मुसाफिर हूँ यारो... ना मंझील है... ना ठिकाना... मुझे बस चलते जाना है... बस चलते जाना...... तुझा विक्रम


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि