80 120
Download Bookhungama App

मातृका - पुरुषोत्तम शिवराम रेगे

Description:

"स्त्री-पुरुष नात्याचा वेगळा पैलू दर्शवणारी स्त्री-पुरुषांमधलं नातं, त्याचे स्थलकालानुसार बदलत गेलेले संदर्भ आणि तरीही कायम असलेले त्यांच्यातल्या प्रेमाचे अनुबंध. ह्याशिवाय पुरुषाला स्त्रीचा मातृकेप्रमाणे वाटणारा आधार, अश्या अनेक गोष्टी उलगडून दाखवणारी ही कादंबरी, ज्येष्ठ लेखक पु.शि. रेगे ह्यांची असून वाचकांना नक्कीच आवडेल अशी आहे."पुरुषोत्तम शिवराम रेगे (जन्म : मिठबाव-रत्‍नागिरी जिल्हा, २ ऑगस्ट, १९१० - १७ फेब्रुवारी, १९७८), पु.शि. रेगे किंवा पुरु.शिव. रेगे हे मराठी लेखक, कवी व नाटककार होते. 

रेगे पाश्चात्त्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्‍न करीत होते. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणार्‍या उत्कट अशा मनोहर भावनांनी त्यांच्या कविमनावर भुरळ पाडली होती. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यात संस्कृतप्रचुर शब्दांची मधुर पखरण असे. “जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे“; अशी त्यांची श्रद्धा व धारणा होती.

“फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळ“ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवा“ यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच “सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि “मातृका“ या कादंबर्‍या दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत. “छांदसी“ हा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह आहे.

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि