60 116
Download Bookhungama App

माणूस म्हणतो माझे घर - राजेंद्र बनहट्टी

Description:

राजेंद्र बनहट्टी हे मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. बनहट्टी यांचे अकरा कथासंग्रह विशेष गाजले. ‘माणूस म्हणतो माझे घर’ हे दोन अंकी नाटक दोन पिढ्यांमधील विसंवादावर बेतलेले आहे. Rajendra banahatti is well-known storyteller and novelist from Marathi literature.  He is author of eleven popular storybooks.  The play ‘Manus mhanto Maze ghar’ is based on emotional conflict and ego issues between two generations.  प्रकाशकाचे मनोगत वयोवृद्ध विद्वान संस्कृतशास्त्री आबा यांच्या कुटुंबात घडणारी ही कथा आहे. आबा जुन्या संस्काराचे ऐशी वर्ष वयाचे वृद्ध आहेत. एक डॉक्टर आणि एक इंजिनिअर असे दोन मुलगे, सुन, आबांचा समवयस्क वैद्य मित्र आणि कॉन्ट्रॅक्टर अश्या एकूण सहा पात्रांभोवती हे नाटक गुंफले आहे. आबांची त्यांच्या वडिलोपार्जित वास्तू आणि बागेवर विलक्षण निष्ठा आहे. तर त्यांचे दोन्ही मुलगे आधुनिक विचाराचे असल्याने त्यांना बदल हवा असतो. मात्र एकीकडे त्यांना वडिलांना दुख्वायचेही नसते. वडिलोपार्जित वाडा पडून त्याजागी नवीन इमारत उभी करावी असा मुलांचा मानस असतो आणि याला आबांचा विरोध असतो. एकूणच नाटकामध्ये वडील आणि मुलांमधली भावनिक गुंतागुंत, दोन पिढ्यांमधील वाढत जाणारे अंतर, विसंवाद, तरीही मुलांच्या मनात आपल्या म्हाताऱ्या जुन्या विचारांच्या वडिलांबद्दल असणारा आदर याची उत्तम मांडणी केली आहे. अखेरीस आबांचा मुलगा त्यांना विष द्यायचं ठरवतो. आबा मरतात. मुलांना जुनी इमारत पाडून नवी उभारण्यासाठी परवानगीही मिळते. आबांचा मृत्यू नक्की कशामुळे होतो? त्याचा मुलगा त्यांच्यावर विषप्रयोग करतो का? मुलांना परवानगी कशी मिळते? या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर हे नाटक आवर्जून वाचले पाहिजे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि