60.00 116.00
Download Bookhungama App

मनपाखरू - सौ. जयश्री अरविंद भडकमकर

Description:

साधे साधे उपाय, सोपे सोपे प्रयोग व सहज सुलभ करता येतील, पटतील अशा गोष्टीतून आपला हेतू सफल व्हावा हाच उपयोग व हेच या पुस्तकाचे प्रयोजन ! मनोगत

वयाची पंच्याहत्तरी उलटल्यानंतर जरा स्वास्थ्य मिळाले आणि काही तरी रिकामे-रिकामे असे वाटू लागले. मग एवढ्या मोठ्या प्रवासात आपल्याला भेटलेली माणसे, त्यांचे स्वभाव व त्यांची मने, त्यांचे वर्तन इ. संबंधी काही लिहावे समाजात ज्यांचा निकटचा सहवास लाभला ती मंडळी, आप्तस्वकीय, मित्र-मैत्रिणी इ. चे स्वभाव वर्तन हे पाहून यासाठी मन हा विषय निवडला व मनपाखरू या नावाने लिहावयास शुभारंभ केला.

समाजात वावरताना मानवी जीवनात कुटुंबापासून सुरुवात केली तर अनेक समस्या, अनेक अडचणी येतात. त्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जोडलेल्या असतात. त्या सर्वांचे मूळ प्रत्येक मानवी व्यक्ती ही वेगळ्या स्वभावाची, वृत्तीची असते म्हणून सर्व गोष्टींमागे मन हे महत्त्वाचे म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा अभ्यास वेगळा, समस्या वेगळी.

यासाठी हसत खेळत मानवी मनासंबंधीची माहिती सोप्या भाषेत सर्वांना कळेल, समजेल अशा भाषेत लिहावी. कारण मानसशास्त्र पाहून, पुस्तक हातात घेऊन व व्याख्या पाठ करून समस्या सुटत नाही, समुपदेशन होत नाही. वास्तव नेहमी वेगळे असते. त्यासाठी अनुभव, विविध पद्धतींचा योग्य ठिकाणी, योग्य पद्धतींचा वापर करून समस्या सोडवावी लागते. मनोरुग्णांचे आजार बरे करावे लागतात. प्रयोग करावे लागतात. ते सर्व सोप्या भाषेत कळण्यासाठी व मानसशास्त्र विषयाची गोडी निर्माण व्हावी, एक दृष्टिकोण  मिळावा म्हणून हा पुस्तक लिहिण्याचा थोडासा प्रयत्न.

 

साधे साधे उपाय, सोपे सोपे प्रयोग व सहज सुलभ करता येतील, पटतील अशा गोष्टीतून आपला हेतू सफल व्हावा हाच उपयोग व हेच या पुस्तकाचे प्रयोजन !


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि