30 50
Download Bookhungama App

मनाचे सामर्थ्य - ह. अ. भावे

Description:

बलदंड शरीर असले तरी मन कमकुवत असेल तर शरीराचे सामर्थ्य मन वापरु शकत नाही. परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा चेहरा निस्तेज व उदास दिसतो. मनात निराशा व स्वार्थबुद्धी असलेले लोक अपयशीच होतात. ईश्वराने माणसाला आशा हे मोठे वरदान दिले आहे. दरिद्री लोक तर आशेवरच जीवन कंठत असतात. मनाचे सामर्थ्य पुरेपूर वापरायचे असेल तर संदेश एकच आहे, ‘मन प्रसन्न ठेवा.’ माणसाच्या जीवनात चारित्र्याचे फार महत्त्व आहे. ज्याचे मन शांत आहे तोच विकारांच्या आहारी न जाता चारित्र्य निर्माण करु शकतो. मनाला दिलेल्या सूचनांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होतो. शरीर प्रतिज्ञा म्हणजे उघडपणे व सार्वजनिकरित्या केलेला निश्चयच असतो. अशा प्रतिज्ञेतूनच यश मिळते.प्रस्तावना बलदंड शरीर असले तरी मन कमकुवत असेल तर शरीराचे सामर्थ्य मन वापरु शकत नाही. परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा चेहरा निस्तेज व उदास दिसतो. मनात निराशा व स्वार्थबुद्धी असलेले लोक अपयशीच होतात. ईश्वराने माणसाला आशा हे मोठे वरदान दिले आहे. दरिद्री लोक तर आशेवरच जीवन कंठत असतात. मनाचे सामर्थ्य पुरेपूर वापरायचे असेल तर संदेश एकच आहे, ‘मन प्रसन्न ठेवा.’ माणसाच्या जीवनात चारित्र्याचे फार महत्त्व आहे. ज्याचे मन शांत आहे तोच विकारांच्या आहारी न जाता चारित्र्य निर्माण करु शकतो. मनाला दिलेल्या सूचनांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होतो. शरीर थकले म्हणून मनुष्य म्हातारा होत नाही; तर म्हातारपण हे मनाचेच असते. ‘मी हे कार्य नक्की करु शकतो’ हा आशावादी जीवनाचा मूलमंत्र आहे. मनाचे सामर्थ्य वाढावे म्हणून मनाशी संवाद करावा. याचे एक साधे उदाहरण आहे. प्रतिज्ञा आणि नवस या दोन्ही गोष्टी उच्चारून दाखवायच्या असतात. तुम्ही जी प्रतिज्ञा केली असेल तिचा रोज उच्चार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या गुणदोषांची यादी करुन मनाशी प्रश्नोत्तरे करु शकता. प्रतिज्ञा म्हणजे उघडपणे व सार्वजनिकरित्या केलेला निश्चयच असतो. अशा प्रतिज्ञेतूनच यश मिळते. ज्याचे मन शांत आहे त्याचे आरोग्य आपोआप राहाते. निद्रानाशाचा विकार मन शांत नसल्यानेच होतो. नेहमी मनात शुभ विचारच बाळगले पाहिजेत. काही लोकांना वाटते की ‘विचारांनी काहीच घडणार नाही.’ प्रत्येक माणसाचे नशीब जन्मत:च ठरलेले असते पण मनात शुभ विचार आणता येणे माणसाच्या हातात आहे व शुभ विचारांचे फळ नेहमीच शुभ मिळते. मन आणि शरीर यांचा समतोल हाच आरोग्याचा आधार असतो.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)