Id SKU Name Cover Mp3
Mama Kshirsagar Jivanyatra


60.00 116.00
Download Bookhungama App

मामा क्षीरसागर जीवनयात्रा - लीलावती भागवत

Description:

१९२० साली मुंबई विद्यापीठाच्या इंटरच्या परीक्षेत पहिला वर्ग मिळविलेल्या मामा क्षीरसागर यांनी गांधीजींची स्वातंत्र्यसंग्रामाची हाक ऐकताच शिक्षण सोडून चळवळीत भाग घेतला; आणि नंतर आयुष्यभर ध्येयवादी वृत्तीने समाजसेवा केली.तसा लहानपणापासूनच, पण माझे वडील वारल्यानंतर मामांचा वडीलकीचा आधार अगदी प्रकर्षाने मला लाभला होता. वयाची साठी उलटल्यानंतरही कुणापुढे न कळत्या वयाच्या लहान मुलीसारखं बसावं, कौतुक करून घ्यावं, समजुतीचे बोल ऐकावे असं ते एकच पितृतुल्य स्थान होतं. अगदी लहानपणापासून मामांनी आमच्या मनावर ठसवलं होतं की संकटांना, अडचणींना सतत धैर्याने सामोरं जायचं, उगीच बिचारेपण बाळगीत लोकांकडून फसवी सहानुभूती गोळा करीत हिंडायचं नाही, आपले प्रश्न आपणच तर्कबुद्धीने विचार करून सोडवायचे ही मामांची शिकवण मनात धरून मी नेहमीच तसं वागायचा माझ्या परीने प्रयत्न करीत आले. पण तरीही कधीकधी एखादा गुंता असा गुरफटून टाकीत असे की त्यावेळी तो सोडवून मोकळा धागा काढण्याची किमया करून दाखवा म्हणून मग मामांनाच गळ घातली जाई, अगदी हक्काने! आणि मामा तो इतक्या शांतपणे, निश्चितपणे सोडवीत की तसा प्रसंग पुन्हा आल्यास स्वसामर्थ्याने त्याची उकल करण्यासाठी मनाची उभारी धरायची तयारी होई. आपण गुंता सोडवू शकू असा विश्वास वाटे. आयुष्यभरात कुटुंबात, नोकरी-व्यवसायात ज्या ज्या वेळी असे प्रसंग आले त्या त्या वेळी माझा हा विश्वास अनाठायी नव्हता याचा मला प्रत्यय आला. नंतर मामांना ते सांगितलं की पाठीवर शाबासकीची थाप पडे. दुसऱ्याला सतत आपल्या दबावाखाली ठेवून आपण स्वतः श्रेष्ठपणा मिरवणं हे मामांच्या रक्तातच नव्हतं. त्यामुळे दुसऱ्यांमधलं बळ, धाडस, विचार जागे करून द्यायचे आणि आपल्या उपदेशाच्या पांगुळगाड्यापासून त्यांना दूर करून स्वतःच्या पायांनी मार्गक्रमण करायला लावायचं हे मामांचं आम्हा मुलांशी वागताना नेहमीचं धोरण असे. मामांच्या साधेपणातला प्रामाणिकपणा अत्यंत विस्मित करणारा होता. काही साधेपणाने राहणारी माणसं गबाळेपणाकडे झुकतात; तर काही माणसं आपल्या साधेपणाचं भांडवल करून त्या साधेपणालाच निरर्थक करून सोडतात. पण मामा या दोन्ही प्रकारचे नव्हते. साधेपणावर त्यांची निष्ठा होती आणि व्यवस्थितपणाची त्यांना आवड होती. त्यामुळे त्यांच्या साधेपणाची कधी चेष्टाही झाली नाही किंवा कुणाला त्याची भीतीही वाटली नाही. दडपणही आलं नाही. त्या साधेपणाची जातच अशी विलक्षण होती की मामांनी सर्वांना प्रेमानं आकर्षून घेतलं.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि