80 176
Download Bookhungama App

लांडगा - राजेंद्र बनहट्टी

Description:

मानवी मनोव्यापाराचे व्यामिश्र आणि कलात्मक चित्रण करणारा कथासंग्रहआजच्या आघाडीच्या कथाकारांमध्ये अव्वल दर्जाचे कथालेखक म्हणून राजेंद्र बनहट्टी हे अग्रगण्य आहेत. मनुष्य स्वभावाचे विविधरंगी पापुद्रे उलगडून दाखवताना राजेंद्र बनहट्टी यांच्या कथेला एक अपरिहार्य आणि विलक्षण विविधता लाभली आहे. विशिष्ट परिस्थितीत सापडलेल्या व्यक्तींच्या मानसिक प्रक्रियांचे सूक्ष्म, सुसंगत, आणि जिवंत चित्र रेखाटताना कथेची लय वाढवीत ती टिपेला नेऊन कथेचा शेवट साधणे आणि कथा संपल्यावरही त्याच लयीत वाचकाला कथेच्या आशयात तरंगत ठेवणे यातच बनहट्टी यांच्या लेखणीचे यश सामावले आहे. बाह्य परिस्थिती आणि मानवी अंतरंग यांचा नेमका समतोल, तपशीलातील अचूक अर्थगर्भात आणि कथेच्या अशायाला बाणासारखा टोकदार पणे जाऊन भिडणारा शब्दांचा अटळपणा या वैशिष्ट्यांमधून निर्माण झालेली राजेंद्र बनहट्टी यांच्या कथेची प्रमाणबद्ध गतिमानता विस्मित करणारी आहे. कुठल्याही जीवनविषयक दृष्टीकोनाच्या आहारी न जाता घेतलेला मनुष्यमनाचा स्वतंत्र, ttsthतटस्थ, हृदयंगम शोध, हा राजेंद्र बनहट्टी यांच्या कथेचा आत्मा आहे. हा शोध घेणारी त्यांची दाहक, शोधक, गहिरी नजर ‘लांडगा’ या कथासंग्रहातील प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवत राहते. - वसंत कानेटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि