60 120
Download Bookhungama App

लघुतम कथासंग्रह - छाया महाजन

Description:

त्याच्या जाण्यानं आधी गेलेले नव्यानं परतत होते. एका माणसाच्या आप्ताच्या आठवणीतून दुसऱ्याच्या आठवणीत तो सहज प्रवेशत होता. गुंतत होता. सुटून दुसऱ्याकडेही जात होता. जणू हे गेलेले सगळे आप्त होते. नाळेसारखे त्यांना जोडणारे नाते होते. मृत्यूचे नाते. कठड्यावर अंगठ्यानं पकड ठेवत त्याची बोट हलत होती. मृत्यू. जे सगळे मेलेत ते अज्ञात स्थळी कदाचित सगळेच एकत्र असतील. मी बाजूला पडलोय. एकटा आहे. परिचित मृत एकत्र असण्याच्या कल्पनेनं त्याची एकटेपणाची भावना प्रबळ झाली. “एकटा येतो. एकटा जातो. मित्र गेला तसा. खरोखर माणूस एकटाच जातो–” चक्र   संध्याकाळ संपून मग रात्र होईल–” त्याच्या शेजारी कठड्यावर रेललेला छोटा अनोळखी मुलगा म्हणाला. संध्याकाळच्या समुद्राकडे तो एकटक पाहत होता. पापणी न लवता स्थिर उभा राहून. आत दुःखाचे कडे कोसळत होते. कितीतरी जग सोडून गेलेली आप्तस्वकीय मंडळी मनाशी गर्दी करून होती. नुकत्याच गेलेल्या मित्रासह. त्याच्या जाण्यानं आधी गेलेले नव्यानं परतत होते. एका माणसाच्या आप्ताच्या आठवणीतून दुसऱ्याच्या आठवणीत तो सहज प्रवेशत होता. गुंतत होता. सुटून दुसऱ्याकडेही जात होता. जणू हे गेलेले सगळे आप्त होते. नाळेसारखे त्यांना जोडणारे नाते होते. मृत्यूचे नाते. कठड्यावर अंगठ्यानं पकड ठेवत त्याची बोट हलत होती. मृत्यू. जे सगळे मेलेत ते अज्ञात स्थळी कदाचित सगळेच एकत्र असतील. मी बाजूला पडलोय. एकटा आहे. परिचित मृत एकत्र असण्याच्या कल्पनेनं त्याची एकटेपणाची भावना प्रबळ झाली. “एकटा येतो. एकटा जातो. मित्र गेला तसा. खरोखर माणूस एकटाच जातो–” त्याच्या छातीत भरून आलं. दुखण्याइतपत. समोरच्या झेपावत येणाऱ्या लाटा चांदीच्या होत्या. त्या तांब्याच्या झाल्या आणि आता लोखंडी काळसर होत चाललेल्या. त्या सगळ्यांचाच संबंध तो जीवनमृत्यूशी जोडत होता. आपणही या लाटांसारखं जगतोय. क्षणभंगूर. तसंच तात्पुरतं फेसाळत जाणं. तसेच अज्ञाताचे रंग अंगावर लेणं. तेच स्वतःचे म्हणून परावर्तीत करणं. स्वतःचं म्हणताना कोणाच्या तरी हातातलं खेळणं होणं, अगदी अंधारात जाऊन पडे पर्यंतचं. तो शहारला. हक्काची शेवटची गोष्टही त्याची नव्हतीच. “मग रात्र होईल–” शेजारचा मुलगा पुन्हा म्हणाला, “त्याला एकदम हायसं झालं.”


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि