60 116
Download Bookhungama App

कृष्णजन्म - राजेंद्र बनहट्टी

Description:

‘कृष्णजन्म’ हा तीन दीर्घ कथांचा संग्रह आहे. या कथा मानवी भावभावना, नातेसंबंध आणि स्वभावाचे कंगोरे उलगडत जातात. आपल्या खास शैलीने बनहट्टी वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात. The Book ‘Krushnajanma ’ is a compilation of three stories About human nature, emotional travel, relationships and behaviour. He engrosses reader with his deft handling of his characters and lucid narrative. प्रस्तावना ‘कृष्णजन्म’ हा राजेंद्र बनहट्टी यांच्या तीन दीर्घ कथांचा संग्रह. त्यांचा आत्मा अस्सल कथेचा आणि आवाका कादंबरीचा आहे. आणि तरीही ह्या दीर्घकथा आहेत. स्वतंत्र, स्वयंभू! राजेंद्र बनहट्टी यांच्या कथा या मानवी अंतरंगाच्या कथा आहेत. अंधाऱ्या लेण्यातील कलाकृती सर्चलाईट च्या झोतात उजळून झळकून जाव्यात तसे मानवी मनाचे चकित आकारणारे असंख्य, अनपेक्षित कंगोरे राजेंद्र बनहट्टी यांच्या कथाशैलीत आपल्याला दिसतात. त्यांच्या कथेतील व्यक्ती या संभाव्य साहजिक तशाच स्तिमित करणाऱ्या असतात. या व्यक्ती नुसतीच कथेतील कळसूत्री पत्रे राहत नाहीत; तर त्या जिवंत माणसांचे रूप घेतात. कारण त्याच्या सहज हालचाली सूचक शब्दात विलक्षण चीत्रदर्शित्वाने साकार होतात. या माणसांचे वागणे आणि प्रसंगाची वीण इतकी सहज सुलभ आणि स्वाभाविक असते, की आपले मन कथेत अखेरपर्यंत गुंतलेले राहते. इतकेच नव्हे, तर कथेत प्रगटलेले मानवी मनाचे तरल, अनोखे आणि चिरंतन रहस्य आपल्याला कायमची हुरहूर लावून जाते. - अरविंद गोखले.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि