60.00 116.00
Download Bookhungama App

कोयनाकाठचा फरारी - बबनराव कोळी

Description:

पोट भरू नको आणि भिक मागू नकोकिंवाबळी तो कान पिळीअसा रिवाज असलेल्या धनिकांच्या माजोरी कृष्णकृत्यांनी, राक्षसी लालसांनी हतबल झालेला श्रमिकवर्ग पाहून ज्याचे अंतःकरण कळवळले... अबलांच्या अब्रूच्या चिंध्या करून, त्यांचा सौदा करणारे अमानुष दलाल पाहिले... आया-बहिणींच्या किंकाळ्यांनी ज्याचे हृदय रक्ताळले... अशा अघोर पातकांची प्रतिक्रिया त्याच्या मनावर एवढी प्रभावी झाली, रक्त इतके सळसळून खवळून उठले की, तो स्वतःच एक जागृत ज्वालामुखी बनला! — अन्यायी, अत्याचारी, जुलमी नरभक्षकांना जिवंत जाळण्यासाठी, त्यांना मातीत मिळविण्यासाठी, त्यांच्या रक्ताच्या रंगपंचमीने समाजाचे अपवित्र अंतरंग धुवून काढण्यासाठी!येथे कर माझे जुळती!

ज्या ग्रामभूमीत मी जन्मलो, वाढलो, ज्या समाजातील न्याय, अन्याय, सत्य, असत्य, दंभ, दया, सूड, क्षमा अशा गुणदोषांच्या दृश्यादृश्य अनुभवांनी मला घडविले; त्या तांबड मातीशी आणि माणसांशी प्रामाणिक राहून, मराठमोळ्या ग्रामीण संस्कृतीशी निष्ठेने एकरूप होऊन, मीकोयनाकाठचा फरारीरेखाटला. त्या काल्पनिक कथानकाशी किंवा घटनांशी समाजातील कोणा व्यक्तीचा अथवा प्रसंगाचा नकळत संबंध जुळला, तरी माझी तशी इच्छा नाही. हेतूही नाही. कथानक संपूर्ण काल्पनिक आहे.

आम्ही जातीनेचुनारी कोळी’. चुना बनविण्यासाठी भट्टीत चुनखडे भाजावे लागतात. भट्टीसाठी आम्हीरानशेणीवापरत असू.

मी वयाच्या सातव्या वर्षी डोंगर-पठारीवर वडिलांच्या सोबत शेणी गोळा करण्यासाठी जात असे. त्या काळी, म्हणजे जवळजवळ तीस वर्षापूर्वीविष्णू बाळा पाटीलतांबवेकर, ह्या कराड तालुक्यातील बंधुनिष्ठ फराऱ्याच्या दर्शनाचा लाभ मला असाच डोंगरात झाला. सज्ञान वयातफरारीहा शब्द व त्या पाठीमागचा इतिहास मनात खोल रुजला. फरारी शब्दाबद्दल जिव्हाळा वाढला. तशात सध्या माझ्या बंधूनेही निःस्वार्थीपणे समाजातील अन्याय, जुलूम समूळ नष्ट करण्याचे व्रत स्वीकारले. त्याचे जीवन ही माझी प्रेरणा ठरली. त्याच्या पाठबळाने माझ्या लेखणीतून अशीच धाडशी कथानके साकार होतील हे निश्चित!

हे कथानक पूर्णत्वास येईपर्यंत मला सर्वतोपरी, सर्वस्वाने सहाय्य करणारी माझी भाची, सौ. शुभदा हिचे सहाय्य मला स्फूर्ती देत राहिले. तिची सहकार्यगंगा कोयनामाईच्या प्रवाहासारखी पवित्र आणि पोषक ठरली. शेवटी सगळी किमया त्या रंगशारदेची!

बबनराव कोळी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि