60 116
Download Bookhungama App

कोपरखळी - मयुरेश वाटवे

Description:

‘कोपरखळी’ हा गोव्यातील पत्रकार मयुरेश वाटवे यांच्या ‘गोमन्तक’ आणि ‘तरुण भारत’ या आघाडीच्या मराठी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या विनोदी लेखांचा संग्रह आहे. ‘Koparkhali’ is a compilation of satirical articles written by Mayuresh Watve a Journalist from Goa. These articles were published in ‘Gomantak’ and ‘Tarun bharat’, leading Marathi Newspaper from Goa. प्रस्तावना ‘कोपरखळी’ या लेख संग्रहामधील लेखांतून मयुरेश वाटवे यांनी अनेक विषय हाताळले आहेत. कॉम्प्यूटर, लग्न, म्युझिकल नाईट्स, बस प्रवास, मेनुकार्ड, क्रिकेट, श्रद्धा, मार्केटिंग वैगेरे वैगेरे आणि व्यवस्थित शाब्दिक कोपरखळ्या मारल्या आहेत त्या मुळातूनच वाचून पाहायला हव्यात. त्यांच्या या ‘कोपरखळी’चं वैशिट्य म्हणजे कुठलही पान उघडावं आणि वाचायला सुरवात करावी. एक-दोन ओळीतच त्यांचं लेखन मनाची पकड घेतं आणि आपण वाचतच जातो. मधून मधून आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलतं, आपल्या नकळत मधूनच आपल्याला हसूही फुटतं... आणि अक्षरश: खळखळून हसता हसता पुस्तक वाचून पूर्ण होतं देखील. मला वाटतं यातच वाटवे यांचे कौशल्य आहे. त्यांच्या लेखनाचा हा पहिला वाहिला प्रयत्न त्यांच्या प्रसन्न लेखनशैलीची चुणूक दाखवतो. - विजय कापडी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि