Id SKU Name Cover Mp3
कोणा एका जाधवाची आत्मकथा


30 104
Download Bookhungama App

कोणा एका जाधवाची आत्मकथा - ल. वि. जाधव

Description:

विविध क्षेत्रातील व्यक्तींची आत्मकथने वाचावयास मिळतात. पण महापालिकेतील कर्तृत्ववानांचे आत्मकथन आढळून येत नाही. म्हणूनच श्री. ल. वि. जाधव यांची आत्मकथा आगळी वेगळी म्हटली पाहिजे.प्रस्तावना एक अपूर्व आत्मकथन विविध क्षेत्रातील व्यक्तींची आत्मकथने वाचावयास मिळतात. पण महापालिकेतील कर्तृत्ववानांचे आत्मकथन आढळून येत नाही. म्हणूनच श्री. ल. वि. जाधव यांची आत्मकथा आगळी वेगळी म्हटली पाहिजे. गेल्या शतकातील प्रारंभाच्या अर्धशतकात खांडेकर, फडके, माडखोलकर आदी लेखकांचे लालित्यपूर्ण साहित्य आणि साने गुरुजींची शामची आई, धडपडणारी मुले अशी पुस्तके तत्कालीन शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडीत होती. त्यातच ‘भारतातून चालते व्हा’ चळवळीने साऱ्या भारतभर एक वैचारिक उठाव केला होता. अशा विविध जडणघडणीतून जाधवांचे व्यक्तिमत्त्व घडले. वाचन, लेखन, चिंतन आणि मुळातच मराठी भाषा प्रेमाची ओढ असल्याने जाधव शालेय जीवनातून हस्तलिखितांच्या छंदात रममाण झाले. त्यास राष्ट्रसेवादलातील सेवाकार्याची जोड मिळाली. हे संस्कार त्यांना महापालिकेत सचोटीचे कर्तव्य पार पाडणयास उपयुक्त ठरले. महापालिकेत कार्यरत असताना कोणाचीही भिडभाड न ठेवता ज्या ज्या व्यक्ती व नगरपित्यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले. त्याने खचून न जाता उलट आपल्या उत्कृष्ट कामाने त्यांना नमविले आणि करदात्या नागरिकांकडून दुर्लक्ष अशी वाहवा मिळविली! मला आनंदाश्चर्य वाटते ते याचे की सेवानिवृत्तीच्या समयी पुणेकर नागरिकांनी माननीय श्री. ना. ग. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जाधवांचा भव्य असा जाहीर सत्कार तर केलाच; शिवाय थोरामोठ्यांच्या हृद्य आठवणींनी संपन्न अशी स्मरणिकाही श्री. रा. अ. कुंभोजकर यांच्या निष्णात संपादनाने प्रकाशित करण्यात आली. श्री. जाधव यांनी आत्मकथनात सेवाकालातील वेगवेगळ्या पदावर कार्यरत असताना प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा वृत्तांत दिला आहे. त्यांचे निवेदन कुठेही कंटाळवाणे वाटत नाही. याचे कारण लेखकाची निवेदनशैली, भाषा अलंकृत करण्याचा आटापिटा नाही. पण योग्य शब्दांची पेरणी करीत निवेदनशैलीला भारदस्तपणा आणला आहे. स्वाभाविकता आणि वास्तवता यांचा सुरेख संगम साधण्यासाठी साधी आणि सुबोध शब्द रचना केली आहे. थोडक्यात, सारी निवेदनशैली घटनांचे सुंदर रेखाटन करण्यात यशस्वी ठरली आहे. श्री. जाधव यांचे हे आत्मकथन म्हणजे एक बोलका चित्रपटच आहे, असेच मला म्हणावेसे वाटते! शिवाय जबाबदारीची कामे पार पाडीत असताना किती नेमकेपणा व तोही संयमशीलतेने पाळावा लागतो याचा धडा इथे अधोरेखित झाला आहे. तो अलीकडील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना मार्गदर्शक ठरावा. - प्राचार्य भिकू पै आंगल


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि