60 116
Download Bookhungama App

कोकण हिरवेगार - दादा मडकईकर

Description:

कवी दादा मडकईकर यांच्या ‘कोकण हिरवेगार’ या कविता संग्रहातील कविता कोकणातील निसर्ग सौंदर्याचे यथार्थ चित्रण करतात. Poems of Dada Madkaikar From ‘Kokan hirvegar’ are portrayal of natural beauty of Kokan.प्रस्तावना अंगी अंगी कविता भिनलेली असावी, त्यातच या गर्द कोकण हिरवाईची अनेकविध रूपं अंतरंगात रुजलेली असल्यास अशा कविमनास एक उन्मेषी साक्ष लाभून त्याची कविता जनसामान्यांच्या मनापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. श्रीयुत दादा मडईकर हे असंच एक उन्मेषी कविमन. एक निर्मळ, निःस्वार्थी मन! निसर्गाचा आनंद मनसोक्त भटकंतीतून लुटावा, निसर्गाचं जे जे रूप दिठीला भावलं ते खोलवर रूजवावं, या निसर्गरूपात सामाजिक जाणिवेतच प्रतिबिंब चिंतावं आणि मग त्याचीच कविता व्हावी, अशी ही दादांची कविता. त्याच्या निर्व्याज मनाचं, अंतर्यामी लपलेल्या विविध कलागुणांचं प्रक्षेपण होत त्यांची कविता निसर्गरुपाला सामोरी जाता जाता फुलू लागते आणि मग केवळ डवरते. - प्रा. जी. ए. बुवा


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि