20 100
Download Bookhungama App

किड्याने घातले कोडे! - भा.रा.भागवत

Description:

भा. रा. भागवत यांच्या खुमासदार लेखन शैलीतून साकार झालेली आवर्जून वाचावी अशी गोष्ट 'किड्याने घातले कोडे!'किड्याने घातले कोडे ! अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना राज्यालगत एका लहानशा खाडीपलीकडे एक बेट आहे. तीन मैल लांब अन् पाव मैल रुंद एवढे छोटे बेट, नाव सलिव्हान्स आयलंड. त्या बेटावर वुइल्यम लेग्रान्द नावाचा तरुण एकटाच राहात असे. सोबतीला फक्त त्याचा शिद्दी नोकर होता - ज्यूपिटर. निरनिराळ्या जातीचे लहानमोठे प्राणी हुडकून काढायचे, त्यांचा अभ्यास करायचा हा त्याचा आवडता छंद. शहरात राहणाऱ्या त्याच्या मित्रांच्या मते तो जरासा चक्रमच होता. अशाच एका जिमी नावाच्या दोस्ताला त्याचे एकदा पत्र आले. “मित्रा! नवा शोध मला चैन पडू देत नाही. मी भयंकर काळजीत आहे. ताबडतोब ये. आणि दोन दिवस राहण्याच्या बेताने ये.” जिमी अंमळ चक्रावला. तसा तो एकदा आपल्या एकांड्या मित्राकडे जाऊन आलेला होता. आणि त्यावेळी लेग्रान्दने आपल्या नव्या शोधाबद्दल त्याच्याकडे सुतोऽवाच केले होते. लेग्रान्दला एक म्हणे विलक्षण कीटक सापडला होता. मेलेले पिंगूळ! पण पिंगूळ असले तरी ते असामान्य कोटीतले होते म्हणे! असामान्य म्हणजे काय ते तो नीट सांगू शकला नाही; आणि त्या वेळी जिमीला ते पिंगूळ बघायला मिळाले नाही. कारण लेग्रान्दने ते तूर्त एका तज्ज्ञ मित्राकडे ठेवलेले होते; पण त्याने त्याचे एक रेखाचित्र काढून दाखवले. खिशातून एक चुरगाळलेला कागद काढून त्यावर त्याने ते चित्र काढले. त्यादिवशी चांगलीच कडक थंडी होती आणि जिमीने शेकोटीजवळ बसल्या बसल्या ते स्केच पाहिले होते. किती चिवट कागद होता तो! आणि चित्र? एक बाजू कोरी होती. जिमीने कागद उलटला अन् नीट पाहिले. पिंगूळ दिसायला सुंदर होते यात शंका नाही. अंगाचा रंग सोनेरी अन् पाठीवर तीन काळे ठिपके. एक पुढे डोक्यावर अन् दुसरे दोन मागे-एकेका बाजूला एकेक. हे रूप सुंदर असले तरी निराळ्या दृष्टीने पाहिले तर ती एक कवटी वाटत होती. आणि आपले हे मत जिमीने लेग्रान्दला स्पष्टपणे ऐकवले. वरचे दोन ठिपके म्हणजे डोळ्यांच्या काळ्याकुट्ट खाचा अन् खालचा ठिपका म्हणजे तोंडाचे विवर! निदान लेग्रान्दने काढलेल्या स्केचमुळे तसा भास होत होता. त्याच नव्या शोधाबद्दल म्हणतोय की काय हा? पण पिंगुळामुळे चिंतेत पडण्याचं काय कारण? मनात हे विचार घोळत असतानाच जिमीने बॅगेत कपडे भरले अन् तो निघाला. दुपारची वेळ असूनही हवा, त्या दिवसाइतकी नसली तरी, चांगली थंड होती. समुद्रकिनाऱ्यावर पोचताच त्याने एक भाड्याची होडी ठरवली आणि तो सलिव्हान बेटावर गेला. बेट तसे रुक्ष नि वैराण. झाडाझुडपाचे नाव नाही. चालत जाऊन त्याने लेग्रान्दचे खोपट गाठले. वूल्फ कुत्रा दारातच त्याच्या अंगावर आला, पण मग त्याने त्याला ओळखले अन् शेपटी हलवली. त्याच्या भुंकण्याचा सूर स्वागतार्थी बनला. लेग्रान्दने आपल्या मित्राचे उत्साहाने स्वागत केले खरे, पण त्याचे मन उदास होते आणि शेकहॅण्ड करणारा त्याचा हात गरम लागत होता. “हा मला सापडलेला किडा बघ. एका कागदी खोक्यातून काही तरी काढून त्याने जिमीच्या हातावर ठेवले होते. “मेलेले पिंगूळ? आणलंस वाटतं त्या तज्ज्ञाकडून?” “होय, पण सापडलं तेव्हा मेलेलं नव्हतं आणि हे साधं पिंगूळ नाही.” “का? तुझ्या त्या एक्सपर्ट मित्राने काय सांगितलं?” “त्याने फारसं काही सांगितलं नाही. त्यालाही ही जात नवी आहे. पण त्याचा रंग पाहिलास?” हे बोलताना लेग्रान्दचा आवाज कापरा येत होता; अंगावर रोमांच उभे राहिले होते. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी आवर्जून हे इ-बुक वाचा.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि