60 136
Download Bookhungama App

काटकसर व बचत - ह. अ. भावे

Description:

प्रत्येक कुटुंबवत्सल माणसाच्या जीवनातील अतिशय महत्वा च्या प्रश्नावरील हे पुस्तक आहे. या पुस्तकात सांगितलेला काटकसरीचा व बचतीचा मंत्र जो पाठ करेल व सतत जगेल त्याला आयुष्यात सुख - समाधान व शांतता लाभेल असा मोलाचा सल्ला या पुस्तकात दिलेला आहे.प्रस्तावना प्रत्येक कुटुंबवत्सल माणसाच्या जीवनातील अतिशय महत्वाच्या प्रश्नावरील हे पुस्तक आहे. या पुस्तकात सांगितलेला काटकसरीचा व बचतीचा मंत्र जो पाठ करेल व सतत जगेल त्याला आयुष्यात सुख - समाधान व शांतता लाभेल. आपल्या समाजात काटकसर करणाऱ्या माणसाची हेटाळणीच केली जाते. त्याला चिक्कू म्हणतात. पण ज्याला काटकसर करायची आहे त्याने या लोकनिंदेला तोंड दिलेच पाहिजे. कारण जर एखादे संकट आले तर त्यातला एकही तुमच्या मदतीला येत नाही. पण काटकसर आणि बचत करून एखाद्या माणसाला फार मोठा उद्योजक किवा अब्जाधीश होता येणार नाही. कारण यशस्वी कारखानदार होण्यासाठी केवळ काटकसरीशिवाय इतर अनेक गुणांची जरुर असते. काटकसरीची सवय ही त्या गुणांपैकी एक आहे. परंतु सर्वसामान्य माणसाचे आयुष्य उत्तम जाण्यासाठी काटकसरीची सवय निश्चितच उपयोगी पडते. काटकसरी माणसाचे मन शांत राहते व ही फार मोठी देणगीच आहे. सामान्य माणसाला काटकसरीची जरुरी का आहे ? हे अनेक उदाहरणे देऊन या पुस्तकात सांगितले आहे. जो या पुस्तकातील सुचनांचा अभ्यास करून अंमलबजावणी करेल. त्याचा खूप फायदा होईल हे नक्की. काटकसर ही व्यक्तीच्या जीवनात जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती संस्थेच्या व राष्ट्राच्याही जीवनात महत्त्वाची आहे. संस्थेलाही राखीव निधी हवाच. राखीव निधी नसेल तर एखाद्या बड्या संस्थेला कर्मचाऱ्यांचे पगारही भागवता न येण्याची नामुष्की पत्कारावी लागते. संस्थेसाठी काटकसर कशी करावी याबाबत या पुस्तकात ' बाया कर्वे ' यांचे उदाहरण दिले आहे ते मनन करण्यासारखे आहे. काही वेळेला योग्य खर्च करणे ही सुद्धा काटकसरच असते. उदा. शिक्षण म्हणजे त्या व्यक्तीचा भविष्यकाळच्या समृद्धीचा पायाच असतो. या पुस्तकात शिक्षणाची किंमत मांडून दाखविली आहे. अनेक विद्यार्थी कॉलेजमधील पिरिएड्स् बुडवतात. बुडवलेला एक पिरिएड भविष्यकाळात त्याला ५०० रुपयाला पडतो हे येथे दाखवून दिले आहे. ' अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे न्यायालयात वाद खेळल्यामुळे संपूर्ण नुकसान होत असते. ' शहाण्या माणसाचे कोर्टाची पायरी चढू नये ' ही म्हण लक्षात ठेवावी. अशा अनेक उपयुक्त सूचना या पुस्तकात दिल्या आहेत. त्या अंमलात आणा आणि तुमचे जीवन सुखी बनवा.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)