40.00 89.00
Download Bookhungama App

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी -

Description:

वाईट कलिकाळाची भविष्यचाहूल समजून घेऊन त्यापासून वाचण्याची, इतरांना वाचविण्याची सर्व सामग्री या ग्रंथांतरी प्रगट आहेमनोगत

संकटकाळी व आनंदाचे वेळी प्रत्येकजण आपापल्या कुलदैवताकडे धाव घेत असतात. कारण संकट निवारण करणारे, मांगल्य प्रदान करणारे एक कुलदैवतच असते.

कुलदैवत नवसाला पावते, हाकेला धावते आणि तेच तर गुरुंच्या रूपात आपल्याशी बोलते व माता - पित्यांच्या रुपात आपली काळजी घेते. प्रत्येकाला आपल्या कुलदेवताचे स्वरूप कळावे, कुलाचार कळावेत, त्या तीर्थाचा महिमा वाढावा आणि आपल्या सुख वृद्धीसह, वंशवृद्धीसह आपल्या मनुष्य जन्माचे सार्थक करून महाराष्ट्र धर्म वाढवावा.

याकरीता महाराष्ट्रातील सर्व आद्य कुलदैवतांची संपूर्ण उपयुक्त माहिती वेद, शास्त्रे, पुराणे, इतर ग्रंथ व परंपरांच्या आधारे मांडूनॐ श्री सद्गुरू समर्थांच्याआशीर्वादाच्या एकसूत्राने बांधून अवघ्या महाराष्ट्राच्या रयतेसाठी धर्ममार्ग सोपा व मोकळा करून देण्याचा प्रकाशकाचा पवित्र मानस आहे.

संस्कृतीचे पुनरुज्जीवनहाच एक ध्यास.

त्याची गोडी वाढविण्यासाठीच हा सर्व ग्रंथ प्रपंच उभारला असे.

या कार्याकरीता जनता जनार्दनाचे आशीर्वाद आम्हाला हवेतच.

वाईट कलिकाळाची भविष्यचाहूल समजून घेऊन त्यापासून वाचण्याची, इतरांना वाचविण्याची सर्व सामग्री या ग्रंथांतरी प्रगट आहे.

प्रपंचातील अनेक अडचणींचे उपाय व कौटुंबिक सुखाचा सोपा मार्गया निमित्ताने मोकळा होत असूनसुखी दांपत्य जीवनाचा अमृतकुंभसोबत आहेच.

गृहलक्ष्मीसवरदायक दिनचर्याजेव्हा घरोघरी स्त्रिया पालन करतील तेव्हाच घराघरात श्रीमहालक्ष्मीचा निवास सुख समृद्धी शांतीरुपात राहील. हेच गुप्त रहस्य आपण सर्वांनी जाणून आचरणात आणायचे आहे.

आपले नम्र

प्रकाशक

 

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि