100 210
Download Bookhungama App

कामसूत्रकार वात्स्यायन - दि. बा. मोकाशी

Description:

प्रस्तुत कादंबरी जगातील पहिल्या कामशास्त्रीच्या (वात्स्यायनाच्या)जीवनावरील कादंबरी असून कामशास्त्राचा जन्म आणि नंदीच्या शापाची कथा तसेच संपूर्ण काम जीवनाचे शास्त्रीय दृष्टीकोनातून विवेचन केलेले आहे.एके समयी शंकर-पार्वती विमानातून जात असता पार्वती शंकराच्या मांडीवर बसून मनोविनोद करू लागली. पण शंकराचे मन त्यात रमेना. हे पाहून पार्वतीने विचारले, ‘महाराज! आज आपण असे उदास का? काही चिंता असेल तर सांगावी. असे म्हणतात की, चिंता आप्तस्वकीयांस सांगून दूर होते.’ शंकर म्हणाले, ‘पार्वती! तुझ्या प्रिय भाषणाने मी प्रसन्न झालो आहे. तरी माझ्या चिंतेचे कारण ऐक. तुला स्मरत असेल की पूर्वी एकदा दिव्य अशा दहा हजार वर्षेपर्यंत आपण दोघे सुरतसुखात रममाण असता, आपली सुरतक्रीडा, दाराशी असलेल्या नंदीने चोरून पाहिली. आपल्या सुरतक्रीडेवरून त्याने हजार अध्याय असलेला कामशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे कानावर येताच, क्रोधाविष्ट होऊन तू नंदीला शाप दिलास की- ‘हे नंदी! ज्येष्ठांची कामक्रीडा पाहून लिहिलेला तुझा उद्धत ग्रंथ पृथ्वीतला- वरून नष्ट होईल. एवढेच नव्हे तर, तू मानवजन्म घेशील आणि कामसंतापाची दु:खे भोगीत पृथ्वीतलावर वणवण हिडशील.’ शंकर पुढे म्हणाले, ‘देवी! त्यावेळी तुझ्या शापाने अतिशय कष्टी झालेला नंदी तुला म्हणाला, - ‘माते पार्वती! मनुष्याचा जन्म घेण्यास आणि पृथ्वीतलावर कामसंतापात वणवण हिंडण्यास मी सिद्ध आहे. पण माझा ग्रंथ नष्ट झालेला मला पाहवणार नाही. तरी हे जगज्जननी! माझा ग्रंथ मी मानवाच्या कल्याणासाठी लिहिला हे जाणून मला उ:शाप दे की, नष्ट झालेला हा ग्रंथ मी माझ्या शापित मनुष्यजन्मात पुन्हा लिहीन व लोक-कल्याण साधीन.’ ‘नंदीच्या डोळ्यांतील अश्रू पाहून, पार्वती! तुझे मन द्रवले. त्यावेळी त्याला उ:शाप देत तू काय म्हणालीस आठव! तू म्हणालीस, ‘नंदी! ऐक! तुझा कामशास्त्राचा ग्रंथ नष्ट होईल, पण ज्याची माता परपुरुषाचा हात धरून पळून गेली आहे असा उद्दालकपुत्र श्‍वेतकेतू, तो ग्रंथ पाचशे अध्यायात नंतर लिहून काढील. त्यामुळे त्याकाळी लोकात फार प्रचलित असलेले परदारागमन थांबेल. श्‍वेतकेतूचा हा ग्रंथही पुढे विस्मरणात जाईल. तो असा विस्मरणात गेल्यावर ब्राभ्रव्य तो दीडशे अध्यायांत लिहून काढील. कालांतराने हा ब्राभ्रव्याचा ग्रंथही, त्यातील प्रकरणे निरनिराळ्या आचार्यांनी वेगवेगळी केल्यामुळे प्रचारातून जाईल. तेव्हा योग्य कामसेवन कसे करावे हे न कळून लोकात अज्ञान पसरून दु:ख वाढेल. अशा वेळी हे नंदी! तू अवंती नगरीत, वात्स्यायन कुलात, मल्लनाग या नावाने जन्म घेशील. त्या जन्मात कामसंतापाची दु:खे भोगीत तुला वणवण हिंडावे लागेल. पण तुझा नष्ट झालेला ग्रंथ तू पुन्हा लिहिशील.’ वात्स्यायनाची कामसूत्रे’ या नावाने तो ग्रंथ लोक ओळखतील आणि त्याला अक्षय कीर्ती लाभेल.’


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)