Id SKU Name Cover Mp3
जीवनसरिता ओळख भारतातील नद्यांची


60 116
Download Bookhungama App

जीवनसरिता ओळख भारतातील नद्यांची - सतीश पोरे

Description:

भारतातील काही निवडक नद्यांवरील हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना सर्वसामान्य लेखकांप्रमाणेच मलाही आनंद होत आहे. प्रस्तुत विषयावर फार कमी पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे या पुस्तकाचा शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी व जिज्ञासू वाचकांना उपयोग होईल.जीवन सरिता आपल्या देशात नद्यांविषयी आदराची आणि पावित्र्याची भावना आहे. व्यासांनी नद्यांना ‘विश्वाच्या माता’ म्हणून संबोधिले आहे; तर तत्त्वचिंतकांनी नदीचे वाहतेपण व वेगवेगळी वैशिष्ट्ये विचारात घेऊन जीवनाला नदीची उपमा दिली आहे. ऋग्वेदातील सुक्तांपासून सर्व देशी भाषांतील साहित्यात, लोकगीतात नदीचा महिमा वर्णन केलेला आहे. नदीकाठी वसलेल्या गावावरुन तेथील संस्कृती, इतिहास, भूगोल आपल्याला समजतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाणी पुरवठा, विद्युतनिर्मिती, वाहतुक नदीमुळे शक्य होते. नदीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती कधीच मागे वळून पहात नाही सतत पुढेच जात रहाते. नदीपासून मिळणारा हा संदेश आपल्या जीवनायुष्याची ध्येय गाठायला मार्गदर्शक ठरतो. त्यामुळे नद्यांविषयी माहिती असणे केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर प्रौढांनाही आवश्यक आहे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि