60 116
Download Bookhungama App

जीवन त्यांना कळले हो - राजेंद्र बनहट्टी

Description:

राजेंद्र बनहट्टी हे मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. बनहट्टी यांचे अकरा कथासंग्रह विशेष गाजले. ‘जीवन त्यांना कळले हो!’ हे दोन अंकी नाटक म्हणजे एका वठलेल्या म्हाताऱ्याची हिरवी, चिरतरुण कहाणी आहे. Rajendra banahatti is well-known storyteller and novelist from Marathi literature. He is author of eleven popular storybooks. The play ‘Jeevan tyanna Kalale Ho’ is story of evergreen old man. प्रकाशकाचे मनोगत  ‘जीवन त्यांना कळले हो!’ हे मराठीतील एक अनोखे नाटक आहे. हे नाटक म्हणजे जगण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या आणि जीवनाच्या सर्व गहिऱ्या रंगांचा आस्वाद घेणाऱ्या एका मध्यमवर्गीय वृद्धाची कहाणी आहे. आप्पा या म्हाताऱ्याच्या जीवनात सांगण्यासारखे असे काहीही घडलेले नाही. तरी तो आपली जीवनकथा सांगताना कुठेही अडत नाही. रुळावरून गाडी जावी तशी ही कथा पुढे जात राहते कारण त्या म्हाताऱ्याने स्वतःच्या चवीसाठी जसा ‘लोणंबा’ हा आंबटगोड आगळा पदार्थ तयार केला आहे; तशीच एक चटकदार, खमंग आणि खट्याळ अशी जीवनदृष्टी त्याने स्वतःसाठी सहजगत्या निर्माण केलेली आहे. प्रचंड दीर्घायुष्य लाभलेल्या या म्हाताऱ्याला ‘कशासाठी जगायचे’ हा प्रश्र कधी पडत नाही. जिवंत माणसाने जगायचे असते; तो दुसरे काय करणार? असे त्याचे सरळ उत्तर आहे. साध्या साध्या आशयगर्भ प्रसंगांतून हे नाटक फुलत जाते आणि अथपासून इतिपर्यंत मानवी मनाच्या क्रीडेत मन गुंतवून ठेवते. नाटकाच्या शैलीला पिकल्या फळाची गोडी आहे. साध्या, सरळ, रसाळ शैलीमध्ये राजेन्द्र बनहट्टी यांनी नव्वदीतल्या जख्ख म्हाताऱ्याचे जे अफलातून चित्र रंगवले आहे ते मराठीत तरी अपूर्व ठरावे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि