60.00 116.00
Download Bookhungama App

जीवन सुगंध - श्रीपाद जोशी

Description:

आपले जीवन कसे सुखी होईल हा माणसाचा ध्यास अनादि काळापासून चालत आलेला आहे. जगातल्या प्रकांड पंडितांनी आपापल्या ज्ञानांच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यांच्या त्या चिंतनाचा सामान्य माणसाला नेहमीच उपयोग होत आला आहे. तरी पण प्रत्येकाचे जीवन हे एक वेगळे, स्वतंत्र कोडेच असते. ते त्याचे त्यालाच सोडवावे लागते. स्वतःचा अनुभव आणि चिंतन यांतूनच त्याला मार्ग काढावा लागतो.भूमिका

आपले जीवन कसे सुखी होईल हा माणसाचा ध्यास अनादि काळापासून चालत आलेला आहे. जगातल्या प्रकांड पंडितांनी आपापल्या ज्ञानांच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यांच्या त्या चिंतनाचा सामान्य माणसाला नेहमीच उपयोग होत आला आहे. तरी पण प्रत्येकाचे जीवन हे एक वेगळे, स्वतंत्र कोडेच असते. ते त्याचे त्यालाच सोडवावे लागते. स्वतःचा अनुभव आणि चिंतन यांतूनच त्याला मार्ग काढावा लागतो.

अशा प्रकारे मार्ग काढण्याचा एका साहित्यिकाचा एक प्रयत्न म्हणजेचजीवनसुगंधया प्रस्तुत पुस्तकातील चिंतन होय. आपले जीवन जगताना आणि इतरांच्या जीवनांकडे डोळसपणे व तटस्थ वृत्तीने पाहाताना मला जे जाणवले ते या लेखांच्या द्वारे मी वेळोवेळी वाचकांसमोर ठेवले. वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले हे लेख माझे सन्मित्र श्री वसंतराव सातवळेकर यांनीपुरुषार्थमधून क्रमशः पुनः प्रकाशित केले; आणि आता ते पुस्तकरूपाने वाचकांसमोर येत आहेत. याबद्दल श्री वसंतराव सातवळेकर यांचा मी अत्यंत आभारी आहे.

या लेखांमध्ये प्रथम पुरुषी सर्वनामाचा सर्वत्र वापर करण्यात आला आहे. याचा अर्थ या लेखांतील सारे अनुभव माझे आहेत, असा करण्याचे कारण नाही. या लेखांतीलमीम्हणजे भौतिकश्रीपाद जोशीनव्हे. तोमीम्हणजे लेखक, चिंतक. सर्वसामान्य जीवन जगणाराश्रीपाद जोशीआणि या लेखांमधून व्यक्त होणारा विचारकमी,’ हे अगदी वेगवेगळे आहेत, हे वाचकांनी कृपा करून ध्यानात घ्यावे. हे काही माझे आत्मचरित्र किंवा स्वानुभवकथन नव्हे, हे लक्षात न घेतल्यास स्वतःची टिमकी वाजविण्यासाठीच मी हे लेखन केले आहे, असा वाचकांचा गैरसमज होईल. तसा तो न व्हावा.

आता असा प्रश्न उपस्थित होतो की अशा प्रकारच्या लिखाणाचे प्रयोजन काय? त्याचा उपयोग काय? यातूनच अधिक मुलभूत प्रश्न निर्माण होतो की कोणत्याही लिखाणाचे प्रयोजन काय असते? लेखक कशासाठी लिहितो? पैसा, प्रचार, प्रसिद्धी, प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून? की केवळ आत्मा भिव्यक्तीच्या अदम्य, अनिवार्य, अप्रतिकार्य प्रेरणेने? या प्रश्नाचे एकच एक उत्तर देणे अशक्य आहे. प्रत्येक लेखकाची या प्रश्नांना वेगवेगळी उत्तरे येतील. स्वतः माझ्यापुरते बोलावयाचे तर माझ्या प्रत्येक लिखाणाची प्रेरणा वेगवेगळी असते. कधी मी पैशासाठी लिहितो, कधी स्वमत-प्रचारासाठी, तर कधी प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात कायम राहून आपली प्रतिमा उजळ करण्यासाठी. परंतु कधी कधी यांपैकी कोणतेच कारण विद्यमान नसते. मनात आलेले विचार शब्दबद्ध केल्याशिवाय मला राहावत नाही, म्हणून मी लिहितो. अशा वेळी प्रकाशनाचा विचार फारसा महत्त्वाचा नसतो. त्यामुळे अनेकदा असे लिखाण प्रसिद्ध न होता मजजवळ पडून राहाते. पण त्याचा मला खेद होत नाही. जीवन जगत असताना कधीकधी सभोवार पसरलेल्या जगात घडणाऱ्या घटना मला अस्वस्थ करतात; आणि त्यावरील आपले भाष्य नोंदविणे आपले कर्तव्य आहे, अशी निकड मला भासू लागते. अशा वेळी जे जीवनचिंतन मी शब्दबद्ध करतो त्याचा लाभ इतरांनाही व्हावा, असे मला वाटते; आणि त्यातूनचजीवन-सुगंधसारखा लेखसंग्रह तयार होतो.

या संग्रहातील लेख मी अनेक वेळा वाचले आहेत. माझ्या इतर पुस्तकांच्या बाबतीत असे क्वचितच घडले आहे. पुस्तक लिहून हातावेगळे झाले की ते मी पुनः सहसा वाचत नाही. व्यवसायिक लेखक या नात्याने स्वतःचे लिखाण वारंवार वाचणे मला परवडणारेही नाही. परंतुजीवन-सुगंधमधील लेखांनी मला वारंवार आपल्याकडे ओढून घेतले आहे. प्रत्येक वाचनाच्या वेळी माझ्या विचारांना जशी चालना मिळाली आहे, तशी मनाला एक प्रकारची प्रसन्नताही लाभली आहे. इतरांनाही ती लाभेल या अपेक्षेनेच हा संग्रह प्रकाशित केला जात आहे.

काही साहित्यांचा वाचकांच्या मनांवर कमी-अधिक प्रमाणात बरा-वाईट परिणाम होतच असतो. तेवढ्या मर्यादित अर्थाने या लेखांचाही परिणाम वाचकांच्या मनांवर होईल, असे मी समजतो. कदाचित काही वाचकांना आपल्या समस्या सोडविण्यास यांतील काही विचारांचा उपयोगही होईल. आपण आपल्या आचरणाकडे किती अलिप्तपणे पाहातो, यावर ते अवलंबून राहील. सुखाप्रमाणे सुगंधाच्याही नाना परी आहेत. प्रत्येकाची आवड-निवड वेगवेगळी असते. ज्यांच्या आवडी-निवडी माझ्या आवडी-निवडींशी जुळणाऱ्या असतील त्यांच्या विचाराला या लेखांतून पुष्कळच खाद्य मिळेल. केवळ पुस्तके वाचून मित्र जोडता येत नाहीत किंवा लखपतीही होता येत नाही. तरीही मित्र मिळवून देणारी व लक्षाधीश बनविण्याचे अमिष दाखविणारी पुस्तके आपण वाचतोच. तसेच काहीसेजीवन-सुगंधच्या बाबतीत म्हणता येईल. याच्या वाचनाने विचारांना चालना मिळेल व जीवनात सुगंध आणण्याच्या दृष्टीने काही सूचक मार्गदर्शनही मिळेल.

परंतु या साऱ्या गोष्टी घडल्या नाहीत तरी एक गोष्ट नक्कीच घडेल. ती अशी की आपण काहीतरी मजेदार, आल्हाददायक, क्षणभर विचार करावयास लावणारे साहित्य वाचले, अशी भावना वाचकाच्या मनात उत्पन्न होईल; आणि आपला वेळ व पैसा वाया गेला नाही, याची प्रचीती त्याला येईल. एवढे घडले तरी मला त्याने समाधान होईल. ‘जीवन-सुगंधहे वाचनीय पुस्तक आहे, इतरांना भेट देण्यासाठी ते वापरले जावे, असे वाचकांनी म्हटले तरी मला तेवढे पुरे.

श्रीपाद जोशी 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि