60 116
Download Bookhungama App

जंगलपटात फास्टर फेणे - भा.रा.भागवत

Description:

भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी एक साहस कथाकर्र्-र्र्-र्र्-क-ट् ! ‘‘ ट्टॉक ! ’’ नीलगिरीचं शांत निबिड अरण्य, पक्ष्यांच्या किलबिलीशिवाय दुसरा कसलाही आवाज होत नाही अशी नीरव शांतता. तिचा भंग करणारे हे कर्कश ध्वनी कुठून बरं उमटले ! बालमित्रांनो ! त्यातला तो दुसरा आवाज तरी तुमच्या ओळखीचा नाही का ?... बरोबर ! बनेश ऊर्फ फास्टर फेणेचा आश्चर्योद्गार आहे तो ! भारी अचपळ पोरगा. ताकदीने मोठा भीम आहे असं नाही. सुदामाच, पण धाडस जणू हाडीमाशी खिळलेलं. मांस थोडं, हाडंच जास्त. बन्या म्हणतो, संकटांना मी काही आपण होऊन आमंत्रण देत नाही. तीच मला सलामी द्यायला टपलेली असतात ! संकट आणि साहस ही फास्टर फेणेच्या पाचवीला पुजलेली असतात खरी; पण त्यामुळेच तो हीरो बनतो. गेल्या वर्षी तर तो चक्क सिनेमातला हीरो बनला होता. एका झटक्यात सिनेस्टार ! एका दिवसापुरता अमिताभ बच्चन. सांगू तो किस्सा तुम्हाला ? ऐका तर- सुट्टीचे दिवस होते आणि पुण्याच्या विद्याभवनची मुले स्पेशल बसने दक्षिण भारताच्या सफरीवर गेली होती. बरोबर त्यांचे आवडते सुर्वे सर होते अर्थात. ते आहेत म्हणूनच तर ही पोरं लांब लांब ट्रिपा काढू शकतात. आताच पाहा ना — फास्टर फेणेचा तमाम मित्रपरिवार त्याच्याबरोबर होता. त्यातल्या त्यात त्याचा खास जोडीदार सुभाष देसाई आणि वर्गाचा स्कॉलर म्हणून नावाजलेला अन् सदैव अभ्यासात डुंबणारा चष्मेवाला शरद शास्त्री ऊर्फ शास्त्रीबुवा. म्हैसूरसारखे सुंदर शहर, तिथले राजवाडे, उद्याने, चामुंडा हिल, देवराज सरोवर हे सगळे त्यांनी पाहिले. मग खाली येऊन उटकमंडच्या सुंदर परिसरात दोन दिवस घालवले आणि आता त्यांची बस पुन्हा उत्तरेकडे चालली होती. परतीच्या वाटेवर. आता वाचा पुढे...


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि